सर्व शाळा,महाविद्यालय व प्रशिक्षण केंद्र आता १४ एप्रिल पर्यंत बंद

दिनांक ३१ मार्च,अहमदनगर:

जिल्‍हयातील सर्व सरकारी शाळा, खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्‍त व्‍यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापनेवरील शैक्षणिक संस्‍था, अंगणवाडया , कोचिंग क्‍लासेस दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते. महाराष्‍ट्रातील लॉकडाऊन हे दिनांक १४ एप्रिल २०२० चे मध्‍यरात्री पर्यत लागू करण्‍यात आल्‍यामुळे आता ही मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोणतही व्‍यक्‍ती, संस्‍था व संघटनांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 व मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43(1) अन्‍वये कारवाईस पात्र राहतील असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष राहुल द्विवेदी यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading