दिनांक 11 डिसेंबर 2024,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील जावाईनगर येथील 35 वर्षीय आदिवासी महिलेने येथील एका पुरुषावर प्रेमसंबंधांत फसवणूक, जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत श्रीगोंदा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी पीडित महिला पतीच्या निधनानंतर मुलगा आणि सुनेसह मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. पाच वर्षांपूर्वी लोणीव्यकनाथ येथील 2 गुंठे जागा खरेदीसाठी जात असताना त्यांची ओळख सुरेश दामु ठाणगे (रा. बेलवंडी कोठार, श्रीगोंदा) या व्यक्तीशी झाली होती.

अत्याचारग्रस्त महिलेच्या म्हणण्यानुसार, सुरेश ठाणगे याला एका गुन्ह्याच्या संदर्भात अटक झाल्यानंतर तिने त्याला कपडे नेण्यापासून ते जामिनावर सोडवण्यापर्यंत मदत केली होती. यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. सुरेशने त्या महीलेला सांभाळण्याचे वचन देऊन, विवाहाचे आश्वासन दिले व लोणीव्यकनाथ येथील जागा, चिंभळा येथील पेट्रोल पंप, तसेच श्रीगोंदा येथे प्लॉट तिच्या नावावर करण्याचे आश्वासन दिलते. याच दरम्यान सुरेशने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पुढील काही काळानंतर सुरेश ठाणगे याचे एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्याने नमूद महिलेशी संबंध तोडण्यास सुरुवात केली. 1 सप्टेंबर 2024 रोजी शनिचौक, श्रीगोंदा येथे त्या महिलेने सुरेश ठाणगेला थेट विचारले असता, त्याने “तुम्ही पारधी खूप माजले आहात” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. शिवाय, परत संपर्क साधल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत पीडित महिलेने विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडेही तक्रार केली. अखेर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुरेश ठाणगेविरुद्ध फसवणूक, जातीवाचक शिवीगाळ, व धमकी दिल्याची तक्रार नोंदवली गेली आहे.

या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलीस करत असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी या आदिवासी महिलेने केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केल्यास..! पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे या पीडित महिलेने माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(फिर्याद)
