दिनांक २२ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार मुकादम व वाहतूकदार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी दादासाहेब (अनिल) पाडळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व ऊस तोड कामगार मुकादम वाहतूकदार संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. शिवराज बांगरे यांनी पाडळे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन, त्यांना नियुक्तीपत्र दिले.
पाडळे यांचा शहरात या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, प्रा. विठ्ठल वाघमोडे, सागर भिंगारदिवे, हिरा पाटोळे, विनोद गायकवाड, विजय गायकवाड, संदीप गायकवाड, जीवन कांबळे, सागर चाबुकस्वार, हनीफ शेख आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देत, नुतन जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांचा मेळावा भगवान गड येथे दि.२५ ऑक्टोबरला होणार असल्याचे सांगून, या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुनिल शिंदे यांनी ऊस तोडी कामगार व मुकादमांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुटणार असून, शासन स्तरावर पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्यात येनार असल्याचे सांगितले.
स्रोत:(दादासाहेब पाडळे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

