दिनांक २२ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी ३० नोव्हेंबरपासून अहमदनगर जिल्ह्यात गाव, गण, गटनिहाय दौरा आयोजित करणार आहे.

तालुक्यातील धनगर आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांना सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक संघटनेत संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी महत्वाची संधी देणार आहोत. असे प्रतिपादन आदेश शेंडगे पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. ‘गाव तिथे वन बूथ टेन युथ‘ या फॉर्मुला नुसार ग्रामीण भागात संघटन बांधणार आहेत.
या दौर्यात मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे संस्थापक आदेश शेंडगे पाटील, (श्रीगोंदा तालुका अध्यक्ष) हनुमंत धायगुडे, (कर्जत तालुका अध्यक्ष) अविनाश मासाळ, (श्रीरामपूर तालुका अध्यक्ष) प्रा. स्वप्नील राऊत (संगमनेर तालुका अध्यक्ष) आकाश दातीर, (पारनेर तालुका अध्यक्ष) गौरव भांड तसेच (सोलापूर जिल्हा अध्यक्ष) विशाल सूळ, संघटनेचे (मुख्य प्रवक्ते तथा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष) राज भाऊ घुमणर, (अहमदनगर जिल्हा प्रवक्ते तथा अध्यक्ष) निलेश वडीतके उपस्थित राहणार आहेत.
स्रोत:(आदेश शेंडगे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
