दिनांक १८ जुन २०२५, श्रीगोंदा/दौंड:

जमिनीच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने दोन जणांवर शिवीगाळ, दमदाटी करत एकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दौंड शहरातील शालीमार चौकात शनिवारी (ता. १४) रात्री घडली.

या प्रकरणी राजु काळे, संदिप काळे, सुषमा काळे, कुसुम काळे (रा. वेताळनगर, दौंड) व भावड्या पवार, सुरज पवार, रेश्मा पवार (रा. काष्टी, श्रीगोंदा) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज भोसले व लखन चव्हाण हे मोटारसायकलवर जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवून दगडफेक केली व तलवारीने हल्ला केला.

यामध्ये धनराज भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
