श्रीगोंदा (ता. २६ जुलै २०२५):
श्रीगोंदा बसस्थानकावरील ६ क्रमांकच्या प्लॅटफॉर्मवर दिनांक २४ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसेगव्हाण येथील अनिल हिरामन गायकवाड (वय २४) यांच्यावर लोखंडी टणक वस्तूने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपी लखन लोंढे, बाळा उल्हारे आणि चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तू माझ्याकडे रागाने का पाहिलं?” असा जाब विचारून लखन लोंढे याने त्यांच्या डाव्या हातावर लोखंडी वस्तूने हल्ला केला. त्यानंतर बाळा उल्हारे व अन्य साथीदारांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांच्यावर पाटील हॉस्पिटल, श्रीगोंदा येथे उपचार करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून भारतीय न्याय संगीता कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची माहिती २५ जुलै रोजी रात्री ११:१५ वाजता पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ राहुल शिंदे तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरु असून श्रीगोंदा पोलिस अधिक तपास करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)



Advertise…
