कमी पाण्यावर तुर फुलविणार अवलिया..

मांडवगण म्हटले कि जमीन भारी दुष्काळामुळे पिकांची दरवर्षी होळी त्यामुळे या परिसरातील शेतकरी संघर्षमय आणि आशावादी जीवन जगत आहेत अशा परिस्थितीत प्रशांत मंगेश सन २००७ ला बी.एस्सी. ॲग्री झाले. शेतीत करिअर करावयाचे ठरविले दोन इंच पाण्यावर सुमारे १५ एकर तुर फुलवून सुमारे साडेसात लाखाचे घेण्याची अनोखी किमया केली आहे.

मंगेश देशमुख यांना वडिलोपार्जित ५० एकर जमीन. आई मिराबाई भाऊ प्रीतम तो पदवीधर पत्नी शितल आणि दोन वर्षांची मुलगी अनन्या असा परिवार लहान पण शिक्षणाचे बळकडू घेतलेला परिवार.

मंगेश व त्यांचे बंधू एकाच्या मळ्यात ज्वारी करडईची पारंपारीक पिक घेत होते. सारा हिशोब केला तर तोट्यातील शेती. कुंटूबांचे विभाजन झाले आणि प्रशांत देशमुख यांनी दुष्काळावर मात करून शेती फुलविण्याचे आव्हान स्विकारले घरातून विरोध झाला. पण प्रशांत डोक्यात शेतीत करिअर ध्येय पेटले होतो त्यामुळे मागे न हाटण्याचा निर्णय घेतला.

सन २०१४ मध्ये एकत्रीत असताना १२ फुट बाय १ फुटावर २२ एकरावर तुरीची दोन इंच पाण्यावर मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात तुरीची लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. आणि २२ एकरात सुमारे लाखाचे घेतले आणि प्रशांत यांचा शेतीतील उत्साह वाढला.

त्यानंतर देशमुख परिवार विभक्त झाला. मंगेश देशमुख यांच्या वाट्याला वडिलोपार्जित १८ एकर शेती आली. अशा परिस्थितीत शेती पिकविणे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत प्रशांत यांनी स्व:ताची १८ एकर आणि सेवा निवृत्त न्यायाधीश एस.बी. देशमुख यांची काही जमीन खंडाने घेतली असुन अतिशय थोड्या पाण्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुर कांदा आदि पिकांचे नियोजन केले.

त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मशनरीचा वापर करत आहे. मजुरीवरील खर्च ५० % नी कमी झाला आहे. त्यामुळे तोट्यात जाणाऱ्या शेतीत नफ्याचा अरूणोदय झाला आहे. देशमुख परिवाराच्या कुंटूबात आर्थिक नंदादीप तेवू लागला आहे.

संदेश

कोशीस करने वाले कभी हार नही होती कोणत्याही कामात तुम्ही प्रमाणीकपणे प्रयत्न केले तर यश निश्चित असते. जीवनात अडचणीत येतात जवान हे सीमेवर समोरून येणाऱ्या गोळ्यांचा कधीच विचार करत नाही. शत्रुचा खत्मा करणे एवढेच ध्येय ठेवतात त्यामुळे ते युध्द जिंकतात. तस शेतीत आडचणी येतात पण आपल पिक अधिक असेल तर त्यासाठी नियोजन केल तर यश येतेच हा माझा अनुभव आहे. प्रशांत देशमुख मांडवगण.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading