दिनांक ३ सप्टेंबर २०२४,श्रीगोंदा:

प्रभाग क्रमांक १ मधील बोरुडे वाडी आणि खड्याचा नंबर या रस्त्यांची झालेली दुर्दशा, ओढ्यावर असलेला कमकुवत पूल आणि इतर नागरी समस्या लक्षात घेऊन विकासकामांसाठी लोकांनी आवाज उठविला आहे. स्थानिक लोकांचे नेते बालू दादा मखरे यांनी या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांना निवेदन सादर केले, ज्यामध्ये विकासकामांची मागणी करण्यात आली आहे.
बोरुडे वाडी आणि खड्याचा नंबर या रस्त्यांवर झालेल्या दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, आणि अन्य प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे शाळेच्या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दत्तवाडी आणि लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळांजवळ वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुलांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे, बालू दादा मखरे यांनी या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.
दत्तवाडीमधील लोकवस्ती मोठी असून, नागरी सुविधांच्या अभावामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मृत्यूनंतर स्मशानभूमीची आवश्यकता लक्षात घेऊन या भागात एक सुयोग्य स्मशानभूमी निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर मुख्याधिकारी पुस्पगंधा भगत मॅडम यांनी दोन दिवसांत सर्वेक्षण करून विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बालू दादा मखरे यांनी दिला आहे.
बालू दादा मखरे यांच्यासह महादेव बोरुडे, संकेत बोरुडे, अनिल साहेब बोरुडे, भैय्या मोटे पाटील, विनायक मोटे पाटील, अनिकेत मखरे, विशाल मखरे, आणि अन्य अनेक स्थानिकांनी निवेदनावर सह्या करून मागण्या मांडल्या आहेत.
स्रोत:(निवेदन)







जाहिरात…
