आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ रहावे: प्रशांत चव्हाण..

दिनांक ४ ऑगस्ट,लिंपणगाव/श्रीगोंदा:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थापैकी भारतीय बौद्ध महासभा ही एक बौद्धांची मातृसंस्था आहे. या संस्थेत बौद्ध बांधवांनी तनमनधनाने सहभागी होवून, आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ रहावे अशे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत चव्हाण (सर) यांनी केले. ते वर्षावास प्रवचन मालिकेते लिंपणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर ओहोळ होते .

ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर सुर्यपुत्र भैय्यासाहेब (यशवंतराव) आंबेडकर यांनी महू ते चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली. बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले व त्या मोबदल्यात बांधवांनी जे धम्मदान दिले.त्यामधून चैत्यभूमीची निर्मिती केली म्हणून आपणास त्या भूमीवर नतमस्तक होता येते. याचे संपूर्ण श्रेय भारतीय बौद्ध महासभेला व आंबेडकर कुटुबीयांना जाते. असे ते म्हणाले.

यावेळी सतिश ओहोळ (सर), बबलू ओहोळ, बलराम ओहाळ, शिवाजी ओहोळ, सुरज ओहोळ यांचे सह माजी श्रामणेर बौद्धाचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख ओहोळ यांनी केले. तर, आभार राजू ओहोळ यांनी मानले.

(स्रोत: सतीश ओहोळ सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading