दिव्यांग माने दाम्पत्याचे घराचे स्वप्न,अग्निपंख फौंडेशनच्या पुढाकाराने साकार..

दिनांक ४ ऑगस्ट,श्रीगोंदा:

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रेरणेने काम करत असलेल्या, अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा येथील दिव्यांग मनोज व जयश्री माने दाम्पत्यास लोक सहभागातून साकारलेले घरकुल भेट दिले. यावेळी घरासाठी संघर्ष करणाऱ्या मानेंच्या डोळ्यातुन आनंदाश्रू तरळले.

या घरकुलाचा अर्पण सोहळा (जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक) सागर पाटील, (तहसीलदार) महेंद्र माळी, (पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव यांचे हस्ते मंगळवारी संपन्न झाला. यावेळी सदरील घरकुल साकारण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मनोज माने हे मुळ कोल्हापूरचे पण, दोन्ही पायांनी अपंग. त्यांचा विवाह पारगाव येथील एका पायाने अपंग असलेल्या जयश्रीशी झाला. जगण्यासाठी या पती पत्नीचा श्रीगोंद्यात संघर्ष सुरु झाला. राहण्यासाठी घर नव्हते यासाठी अग्नीपंखने पुढाकार घेतला आणि ५२८ चौरस फुटाचे सर्व सुविधायुक्त घरकुल उभारले.

अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील म्हणाले की, अग्नीपंख फौंडेशनने दिव्यांग माने दाम्पत्याचं घरकुलाचे स्वप्न पुर्ण केले. ही आनंदाची बाब आहे. भविष्यात गरजुसांठी १०० घरकुलं उभारावेत अशी शुभेच्छा अग्निपंखच्या टीमला दिली.

तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले कि, दिव्यांग माने परिवारास अग्नीपंखने लोक सहभागातून घरकुल बांधून दिले, हे कौतुकास्पद आहे.

माने कुटुंबाला अग्निपंख फौंडेशनने बांधून दिलेले घर.

(पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव, (महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य) ज्ञानदेव म्हस्के, (छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य) डॉ. एकनाथ खांदवे, (गटविकास अधिकारी) प्रशांत काळे, (तालुका वैद्यकीय अधिकारी) डॉ. नितीन खामकर, अनील घनवट, एस. पी. कोंथबीरे, सुधाकर वांढेकर, सतिश लगड, सुदाम पवार, वांबोरीच्या माजी सरपंच कावेरी पटारे उपस्थित होते. सुत्रसंचलन विशाल चव्हाण यांनी केले.

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading