दिलदार बच्चू,अनाथांचा नाथ..

कबड्डी खेळत असताना मित्राला रक्ताची उलटी झाली . मित्राचा हा आजार त्याच्या जिवावर बेतणारा होता . मित्राकडे उपचारासाठी एकही दमडी नव्हती . अशा परिस्थितीत मित्राच्या उपचारासाठी महिनाभर काम केले . कबड्डीतील बक्षीसाच्या रकमेतून मित्राचे ऑपरेशन केले. ऑपरेशनसाठी रक्ताची गरज असताना सहजासहजी रक्त मिळत नव्हते . यावेळी वजन कमी असल्यामुळे खिशात दगड भरले . सतराव्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान करत मित्राचा प्राण वाचविला . येथपासून सुरु झालेला रुग्णसेवेचा वसा आजही स्वत : ठेवणारा अनाथांचा नाथ म्हणजे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू . वडीलांपासून सुरु झालेला रुग्णसेवेचा वसा आजही ते चालवत आहेत . आज हजारो लोकांचा जीव त्यांनी वाचविला असून अखंडपणे काम सुरुच आहे.

अमरावती जिल्ह्यातील बेलोरो गावी ५ जुलै १९७० या दिवशी इंदिरा व बाबाराव कडू या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. सर्वांचे लाडके असल्याने आजोळची माणसं लाडाने बचू म्हणत . घरच्यांनी त्यांचे नाव ओमप्रकाश ठेवले. बेलोरो हे २१ गावातील विस्थापितांचे गाव . याच गावात बच्चू कडू यांचे वडील बाबाराव यांनी आयुष्यभर रुग्णसेवा केली . गावात कुणी आजारी पडलं की ते स्वत : चा टांगा घेऊन दवाखान्यात नेत असत . हाच रुग्णसेवेचा वारसा बच्चू कडू पुढे चालवत आहेत .

लहान असताना खळ्यातील कचरा जाळत असताना शेजारच्या शेतक – याचे ज्वारीचे पिक जळाले . या घटनेचे प्रायश्चित म्हणून त्यावेळी बच्चू कडू यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला . त्यावेळेस आई इंदिरा यांनी मुलाचा प्राण वाचविला .

माध्यमिक शिक्षण टोम्पे महाविद्यालय चांदुरबाजार येथे झाले . स्वत : ची शाळा सुंदर दिसावी म्हणून रात्रीच शाळा रंगविली . इयत्ता नववीत असताना गावातील तमाशा बंद व्हावा म्हणून पहिल्यांदा आंदोलन केलं . सरपंचानी ऐकले नाही म्हणून ३ मित्र सोबत घेऊन ३२ किलोमीटर रात्रीचा प्रवास करत अचलपुर प्रांत कार्यालय गाठले . मुलांची ही तळमळ पाहून प्रांतधिका – यांनी गावातील तमाशा बंद केला . तमाशगिरांचा पोटासाठी गावातील लोकांकडून धान्य गोळा केले .

कॉलेजला असताना बच्चू कडू विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आले . ही त्यांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक . त्यावेळेस अमरावतील जिल्हा सहकारी बँकेने कर्ज परतफेड न केल्याने हजार शेतक – यांचे ट्रक्टर जप्त केले.यावेळी बच्चू कडू यांनी बँकेच्या विरोधात आंदोलन छेडले . आंदोलनामुळे हजार रुपयांच्या जामीनावर ट्रक्टर सोडून घेतले . त्यानंतर ते बेलोराचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले . स्वत : ला सरपंच होण्याची संधी असतानाही गावात एकच घर असलेल्या मुस्लीम व्यक्तीला त्यांनी सरपंच बनविलं . पुढे त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पंचायत समिती लढविली . पंचायत समितीचे सभापती होण्याची संधी त्यांना मिळाली . सभापती झाल्यानंतर त्यांनी तालुक्यात कामाचा धडाका लावला . याचवेळी त्यांनी शौचालयाचा घोटाळा उघडकीस आणला . त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद व्हायला लागले . मी पक्षाचा गुलाम नसून जनतेचा आहे , असे म्हणत पक्षाला रामराम ठोकला . सभापती असताना दिव्यांगाना सायकल मिळण्यासाठी २५० सायकलींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविला . मात्र प्रशासनाने तोंडाला पाने पुसली . अवघी १ सायकल मंजूर केली . आमदार कडू यांनी स्वत : च्या लग्नाचा सर्व खर्च टाळून , कोणालाही जेवण न देता , वडीलांची एफडी मोडून ३०० दिव्यांगाना सायकल वाटल्या .

लोकांच्या आग्रहाखातर १ ९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरले . त्यावेळी फॉर्म भरायला जवळ पाच हजार रुपयेही नव्हते . यावेळी लोकांनी त्यांच्यासाठी २५ हजार रुपये जमा केले . काही महिलांनी अक्षरस मंगळसूत्र गहाण ठेवले . निवडणुकीत त्यांचा अवध्या तेराशे मतांनी पराभव झाला . तरीही कामाचा सपाटा सुरुच ठेवला . २००४ च्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले . येथेही त्यांना यश आले नाही . २००४ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून विधानसभा लढविली . तेव्हापासून सलग तीनवेळा ते अपक्ष म्हणून अचलपूर मतदार संघातून निवडून येत आहेत . ‘ आमदार राहुटी ‘ हा उपक्रम त्यांनी राबविला . त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सर्व प्रमाणपत्रे गावातच मिळू लागली . मतदार संघात कुणाला शस्त्रक्रिया करायची असेल तर मदतीला धावून येतात ते आमदार बचू कडू . १ ९९ ५ साली दिव्यांगाच्या निधीसाठी आंदोलने केली . रेल्वे अडविल्या . अंहिसेंच्या मार्गाने अनेक आंदोलने केली . मात्र मागण्या मंजूर न झाल्याने अधिका – यांवर हातही उचलला . जनतेसाठी अधिकारी काम करत नसतील तर ते कायदा हातात घेतात पण जनतेची गैरसोय होऊन देत नाहीत .

आमदार झाल्यानंतर १० वर्षे भाड्याच्या खोलीत राहिले . सुरुवातीच्या काळात स्वत : कडे कसल्याही प्रकारचे वाहन नव्हते . आमदाराला मिळणा – या पैशातून रुग्णालयाला अॅम्बुलन्स भेट दिल्या . आजही चालता चालता गरजू माणसांच्या खिशात सहजपणे हजार- पाचशे रुपये ते घालतात . अनेक निराधारांना लोकवगीतून घरे बांधून दिली आहेत . निलंग्यात मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला . या अपघातामध्ये एका गरीबाचे घर कोसळले . या कुटुंबाला शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही . मात्र कुटुबांच्या मदतीला आमदार बच्चू स्वत : धावून आले अन गरीबाचे घर उभे राहिलं . दिव्यांग , शेतकरी , विधवा , कामगार , गरीब , बेरोजगार आजही अनेक लोकांचे प्रश्न ते हाताळत आहेत . शेतक – यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलने केली . आतापर्यंत शेतकरी कर्जासाठी तब्बल ८० प्रकारची आंदोलन त्यांनी केली . त्यांनी आसूड यात्रा राबविली . शेतक यांसहित रक्तदान आंदोलन गाजले .

निवडणुकीचा प्रचार करत असताना एका वृध्दाचे बोलणे मनाला टोचले . याचवेळी निवडणुकीचा प्रचार थांबविला अन ५ हजार नेत्रतपासण्या केल्या . यातूनच त्यांची समाजकारणासाठी राजकारणाचा त्याग करण्याची वृत्ती दिसून येते . जनतेच्या कामासाठी त्यांनी प्रहार संघटना स्थापन केली . ही प्रहार संघटना वंचितासाठी महाराष्ट्रभर काम करत आहे . या अवलियामुळे अनेक वंचितांना न्याय मिळाला आहे .

शब्दांकन : उध्दव ढवळे , उख्खलगाव.
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading