भाऊसाहेब घोडके यांचे हृदयविकाराने निधन..

दिनांक १० जून, श्रीगोंदा:

शहरातील सिद्धार्थनगर येथे वास्तव्यास असलेले भाऊसाहेब रूपचंद घोडके यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ४० वर्षांचे होते.

त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते परिसरात सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व होते. कुटुंब उदरनिर्वाहाबरोबर मुलांच्या संगोपनासाठी सतत झगडत असलेल्या भाऊसाहेबांच्या निमित्ताने या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. सिद्धार्थनगर व ससाणेनगर येथील नागरिकांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधामुळे अनेकांनी त्यांच्याबद्दल दुखी भावना व्यक्त केली आहे. आज त्यांच्यावर शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. bhausaheb-ghodke-dies-of-heart-attack

https://bit.ly/bspmycityshrigonda

भाऊसाहेबांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्रोत:(मृत्यू वार्ता)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading