दिनांक १० जून (मढेवडगाव, श्रीगोंदा):
तालुक्यातील मढेवडगाव गावातून जाणाऱ्या नगर दौंड राज्य मार्गावर रात्री नऊ वाजता प्रतिक पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत भंगार वेचून, उदरनिर्वाह करणार्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ७ जून रोजी घडली आहे.

बाळासाहेब बबन फटे (वय ५६) राहणार मढेवडगाव हे सायकलवरून आपल्या घरी परतत असताना, नगर दौंड रोडवरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाले. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी १०८ क्रमांकावर फोन करून ॲम्बुलन्स मागवली. मात्र, त्यात आलेल्या डॉक्टरांनी अपघातग्रस्त फटे यांची प्राथमिक तपासणी करून, ते मयत झाले असल्याचे सांगितले.

यानंतर मयत बाळासाहेब फटे यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. भंगार गोळा करून, कुटुंबाचे पालन, पोषण करणाऱ्या बाळासाहेब फटे यांच्यावर अकस्मात आलेल्या दुर्दैवी मृत्युनंतर परिसरात दुःख व्यक्त होत आहे. shrigonda- isma- who- was- selling- scrap- metal- died-in- a-collision- with- an-unknown- vehicle
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस स्टेशन)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे..
