दौंड पोलिसांची मोठी कारवाई: श्रीगोंद्यातून येणारी १ लाखांची गावठी दारू जप्त..

दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ दौंड/श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून दौंड शहरामार्गे जाणारा अवैध दारूचा साठा पोलिसांनी मध्यरात्री पकडला आहे.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरच करण्यात आलेल्या या कारवाईत १ लाख ६२५ रुपयांची (८०५ लिटर) गावठी दारू आणि २.५ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा मद्यसाठा काष्टी (ता. श्रीगोंदा) येथून दौंडमार्गे रेल्वे उड्डाणपुलाच्या दिशेने जात होता.

यलगुंड महादेव दोडमणी (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याचा नगर मोरी परिसरात गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक रमेश साळुंके व गृहरक्षक दलाचे जवान अतुल कुतवळ यांनी संशयास्पद टेम्पो थांबवला. त्यात २३ कॅनमध्ये भरलेली दारू सापडली.

याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार अमीर शेख पुढील तपास करत आहेत.

४ फेब्रुवारी रोजी याच परिसरात १ कोटी ३९ लाखांचे मद्य पकडल्यानंतर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading