तर महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य येईल – शिवव्याख्यात्या सुनंदा भोस…

दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

प्रत्येक मातेने जिजाऊंसारखे आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत, त्यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे. फसव्या भावापेक्षा खऱ्या भावाला जपले पाहिजे. इन्स्ट्राग्राम, व्हाटसअप, इन्टरनेट पासून स्वतःला व मुलांना दूर ठेवले तर निश्चितपणे दुसऱ्याच्या नाहीतर तुमच्या घरात शिवबा जन्माला येईल आणि महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य येईल असे प्रतिपादन शिवशंभू व्याख्यात्या सुनंदाताई टिळक भोस यांनी केले.

मढेवडगाव येथील जिल्हा परिषद उंडेमळा शाळेत मावळा प्रतिष्ठाण, मढेवडगाव आणि शंभूराजे युवा प्रतिष्ठाण उंडेमळा / शिंदेमळा यांचे संयुक्त विद्यमाने ‘ शिवजयंती उत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षि नागवडे सहकारी साखर कारखान्याचे मा व्हा. चेअरमन, जेष्ठ संचालक सुभाष काका शिंदे होते.

शिवव्याख्यात्या सौ. सुनंदाताई टिळक भोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून महिलांना जागृत केले. अंधश्रद्धा मानू नका, दूरदृष्टी ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिरसगावचे मा. सरपंच तेजमल धारकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज सुपेकर, मा. अध्यक्ष नवनाथ उंडे, ग्रा पं सदस्या सोनालीताई उंडे, गोरख राजे उंडे, भगवानराव गायकवाड, प्रा. मनोहर उंडे, जगदेव उंडे,

पांडूरंग उंडे, निळकंठ उंडे, दिपक पवार, अजय पवार, सचिन गिरे, सोमनाथ खराडे, प्रमोद वाबळे, नितीन शिंदे, महेश शिंदे, संजय शिंदे, माणिक मांडे, किशोर मांडे, मेजर नवनाथ शिंदे, राहूल शिंदे, भरत शिंदे, सिदधेश मांडे, सोहम शिंदे,

सुहास मिसाळ, योगराज उंडे, सूरज उंडे, गोरखराव मांडे, अनिल थोरात, अशोक बनकर, अभिजित कुताळ,सविता मांडे, सुवर्णा शिंदे, शुभांगी पवार, तृप्ती शिंदे, श्रद्धा गायकवाड, प्रियांका शिंदे, मंगल मांडे, मंदा मांडे, शशिकला शिंदे, रोहिणी उंडे,

वैशाली शिंदे, संगिता शिंदे, चंदाकाकी उंडे, प्राजक्ता उंडे, राणीताई शिंदे, हौसाबाई उंडे, लंकाबाई उंडे, सुलोचना मांडे, रतन शिंदे, शितल शिंदे, वैशाली शिंदे, कमलबाई शिंदे, निशा उंडे, वच्छला शिंदे, सिमा उंडे, अलका ठाकरे, रत्नप्रभा ठाकर, सुप्रिया उंडे, मंगल उंडे, अंजाबाई उंडे, सुमन उंडे,

पल्लवी शिंदे, जनाबाई शिंदे, संदेशा मांडे, प्राजक्ता शिंदे, संगिता पाचपुते, संध्या शिंदे, सुवर्णा शिंदे, ज्योती शिंदे, अर्चना शिंदे, बेबीताई मांडे, मंगल उंडे, वर्षा उंडे, भागूबाई थोरात, अरुणा उंडे, कल्पना उंडे, आदि माता पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन संतोष इंगावले यांनी केले. रामदास ठाकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक नवनाथ उंडे यांनी तर आभार गोरखराजे उंडे यांनी मानले. शंभूराजे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधि काऱ्यांनी जयंतीचे उत्कृष्ट नियोजन केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading