दिनांक ८ जून(चांडगाव,श्रीगोंदा):
कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर चांडगाव येथे जयराज फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबिरात चांडगाव ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. स्व.जयश्री (आक्का) राजेंद्र म्हस्के यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये संजीवनी रक्तपेढी पुणे यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी नेते प्रमोद म्हस्के, अजित म्हस्के, महेश म्हस्के, अमोल चव्हाण, राहुल म्हस्के, प्रविण म्हस्के, अभिराम चाकणे, शुभम म्हस्के यांनी परिश्रम घेतले.
