कोळगाव मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी…

दिनांक २३ मे २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

कोळगाव मध्ये २५६८ वी बुद्ध पौर्णिमा सकल समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी धम्म प्रार्थना, धम्म सुक्त घेण्यात आले. दरवर्षी कोळगाव मध्ये बुद्ध पौर्णिमा बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात व विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोळगाव चे सरपंच पुरुषोत्तम लगड व प्रमुख पाहुणे ओंकार नलगे उपस्थित होते.

बौद्धाचार्य भारत आल्हाट यांनी याप्रसंगी त्रिशरण, पंचशील, भीम उपासना व सुक्त या प्रार्थने द्वारे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उपासना करण्यात आली. त्यानंतर सर्वांना खीर वाटप करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार महेशकुमार शिंदे, सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी समाज प्रबोधन केले.

यावेळी धनश्री लगड, ओंकार नलगे, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, जयराज लगड, प्रदीप आढाव, प्रतिभा धस, शिवराज देशमुख, शोभा उजगरे, सुनीता उजगरे, छाया उजगरे, रेखा उजगरे, मीना उजगरे, सारिका उजगरे, राणी उजगरे, स्वाती उजगरे, सोनाली उजगरे, प्रियांका अक्षय उजगरे, एकता उजगरे, माया उजगरे, रंजना उजगरे, ज्योती हेमंत उजगरे, पल्लवी उजगरे, संगीता उजगरे, प्रमिला उजगरे, रिटा उजागरे, लता उजगरे, आशा पवार, अर्चना उजगरे, भारती उजगरे, रेश्मा उजगरे, मनोरमा भोसले, कुंदा उजगरे, कांताबाई उजगरे, निकिता उजगरे, शकुंतलाबाई उजगरे, संगीता उजगरे, प्रियंका निलेश उजगरे तसेच संदीप उजगरे, अनुप उजगरे, श्रीकांत उजगरे,

काळूराम उजगरे, प्रणत उजगरे, हेमंत उजगरे, किरण उजगरे, नंदू उजगरे, अक्षय उजगरे, वैभव उजगरे, रितेश पवार, नागेश उजगरे, सनी उजगरे, सन्मान उजगरे, विकास उजगरे, चंद्रकांत उजगरे, श्याम भोसले, अंकित उजगरे, राजेश उजगरे, हरीश उजगरे, सतीश उजगरे, रवींद्र उजगरे प्रवीण उजगरे, उपस्थित होते.

या कार्यक्रमास लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदानासाठी ज्योती आणि संतोष उजगरे यांनी मदत केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलास उजगरे यांनी केले.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading