दिनांक २३ जानेवारी, श्रीगोंदा:
हिंदु हृदय सम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी चौक येथे संपन्न झाला. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (तालुका प्रमुख) बाळासाहेब दुतारे, शिवसेना (शहर प्रमुख) संतोष खेतमाळीस, युवासेना (तालुका प्रमुख) हरिभाऊ काळे, युवासेना (तालुका संघटक) नाथाभाऊ पवार, युवासेना (शहर प्रमुख) ओंकार शिंदे यांनी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे (ज्येष्ठ नेते) भाऊसाहेब गोरे श्रीगोंदा (नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष) बाळासाहेब शेलार, (नगरसेवक) शहाजी खेतमाळीस, (माजी उपनगराध्यक्ष) राजू दादा गोरे, संतोष इथापे, शिवसेना (माजी शहर प्रमुख) सुरेश देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हिंदु हृदय सम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने श्रीगोंदा तालुका ग्रामीण रुग्णालयात शिवसेना, युवासेनेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील डॉ. राजुळे सर, डॉ. थोरात सर, डॉ. यादव सर हे उपस्थित होते. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेना (तालुका महिला आघाडीच्या) मनीषा काळे, (तालुका संघटक) नंदकुमार ताडे, (उपतालुका प्रमुख) संतोष शिंदे, जठार भाऊसाहेब, नितीन गायकवाड, कुंडलिक घालमे, जावेद फकीर, अनिल सुपेकर, मयुर गोरे, योगेश भुतकर, राहुल भालेकर, कृष्णा भालेराव, अनिरुद्ध पावशे, अक्षय खेतमाळीस, संपत गायकवाड, म्हस्के मामा, संभाजी घोडके, संतोष चिकलठाने, योगेश लांडगे, रविन खराडे, सनी कोथिंबीरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(हरिभाऊ काळे,शिवसेना,श्रीगोंदा)
