दिनांक २४ जानेवारी, श्रीगोंदा:
राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक असलेले संत शेख महमंद महाराज (बाबा) यांच्या विचारांचा प्रभाव सबंध देशावर आहे. त्यांनी सामाजिक ऐक्या बरोबर मानवी मूल्यांची शिकवण दिली. २६ जानेवारी २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथ वर महाराष्ट्राच्या संतपरंपरेची गौरव गाथा सांगणारा चित्ररथ सादर होणार आहे. रथावर शक्ती – भक्तीचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज व इतर चौदा संतांचा सामावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. या पंक्तीमध्ये समतावादी शिकवण देणारे संत शेख महंमद महाराज (बाबा) यांचाही समावेश करण्यात आला असल्याने, श्रीगोंद्यातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

संत शेख महंमद महाराज (बाबा) यांच्या दर्ग्यामध्ये (मंदिरात) श्रीगोंदयातील ग्रामस्थांनी उपस्थित होऊन हा आनंद उत्सव साजरा केला. सर्वांचे पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले. तसेच फटाके वाजवण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित अभ्यासू व जाणकार व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. बाळासाहेब बळे यांनी संत शेख महंमद महाराज (बाबा) यांची प्रतिकृती महाराष्ट्रच्या चित्ररथात समाविष्ट करण्यात आल्याने शेख महंमद महाराजांचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश सबंध जगासमोर जाणार आहे.यामुळे सर्व ग्रामस्थांसह संत शेख महंमद महाराज (बाबां)प्रती आदर असणाऱ्या सर्वांना मोठा आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, केंद्र व राज्य शासनाचे सर्वानुमते मनापासून अभिनंदन केले.
यावेळी पोपट(आबा) खेतमाळीस, आघाव भाऊसाहेब, (श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा) शुभांगीताई पोटे, (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाणे, हभप भूषण महाराज, (नगरसेवक) सतीश मखरे, संतोष खेतमाळीस, संतोष क्षिरसागर, संग्राम घोडके, (युवा सेनेचे) हरिभाऊ काळे, (माजी उपनगराध्यक्ष) अशोक खेंडके, (माजी उपनगराध्यक्ष) राजू दादा गोरे, नानासाहेब कोथिंबीरे, बंडूभाई शेख, गोपाळ मोटे पाटील, राजू शेख, अजिज शेख, सोहेल शेख, अशोक आळेकर, शहाजीभाऊ खेतमाळीस, बंडू दहातोंडे, सुदाम झुंजरूक, संदीप दहातोंडे, अंबादास औटी, मेहेत्रे भाऊसाहेब, लक्ष्मण कोथिंबिरे, सुरेशशेठ भंडारी, सतीशशेठ मुनोत सह यात्रा कमिटी, महंमद बाबा दर्गाचे ट्रस्टी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या आनंद सोहळ्याचे प्रस्ताविक अशोक आळेकर यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रशांत गोरे यांनी केले. पोपट आबा खेतमाळीस, प्रा. बाळासाहेब बळे, शुभांगीताई पोटे (नगराध्यक्षा), हभप भूषण महाराज, अशोक आळेकर इत्यादींनी आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त करीत, राज्य व केंद्र शासनाचे अभिनंदन केले.
स्रोत:(संत शेख महंमद महाराज(बाबा) यांच्या श्रध्दास्थळी घेतलेली बैठक )
