दिनांक १३ जानेवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपरिषदमध्ये होत असलेल्या अनेक कामाच्या अनियमितेबाबत वेळोवेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी करून, कारवाई व्हावी अशी अपेक्षा असताना जिल्हा प्रशासन अधिकारी मात्र,त्याकडे कानाडोळा करत होते.

ही बाब लक्षात आल्या नंतर ब्रिगेडने आंदोलनात्मक भूमिका घेतली, जिल्हधिकाऱ्यां कडे तक्रार करून १० डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या दालनात संभाजी ब्रिगेडने ठिय्या आंदोलन केले.याची दखल घेत, जिल्हा अधिकारी अहमदनगर यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या विरोधातील तक्रारीवर उपविभागीय अधिकारी ,श्रीगोंदा पारनेर यांनी चौकशी करावी,असा आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांना दिला.
त्यावर जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी ३० डिसेंबर रोजी आदेश पारित केला की, उप विभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर यांनि टिळक भोस, जिल्हा अध्यक्ष, सतीश बोरुडे शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड व अँड समित बोरुडे यांच्याकडून प्राप्त झालेल्या १३ तक्रारी बाबत आपले स्तरावर चौकशी करून १५ जानेवारी २०२१ पर्यत अहवाल सादर करावा.
या तक्रारी मध्ये:
▪️घनकचरा व्यवस्थापणासाठी ई बी इनव्होयरो बायोटेक प्रा.ली.या कंपनीला श्रीगोंदा नगरपरिषदेने बेकायदेशीर पणे दिलेल्या ठेक्यामध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्या बाबत,
▪️घनकचरा ठेकेदारांच्या निष्काळजीपणामूळे फोगिंग मशीन आणि घंटा गाडी जळून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत,
▪️विनापरवाना रस्ते खोदाई प्रकरणी जिओ डिजिटल फायबर प्रा.ली. यांच्या कंपनीला झालेला दंड वसूलिस टाळाटाळ केल्याबाबत,
▪️नगरपरिषदेत होणाऱ्या सभांचे इतिवृत्त सभा झाल्यापासून सात दिवसात नगरपरिषदेच्या वेबसाईटवर नागरिकासाठी खुले न केल्याबाबत,
▪️विद्युत विभागातील देखभाल व दुरुस्तीच्या बेकायदेशीर मंजूर केलेल्या व त्यास मुदतवाढ देऊन चालू असलेल्या ठेका रद्द करण्या बाबत,
▪️घनकचरा अनियमत्ता बाबत कागदपत्रे मागितले असता, आरोग्य निरीक्षक मोहन लोंढे यांनी दिलेल्या धमकी व वापरलेल्या अर्वाच्य भाषेबाबत,
▪️श्रीगोंदा शहरात नव्याने तयार झालेल्या १७ रस्त्याच्या कामातील अनियमितेबाबत,
▪️श्रीगोंदा नगरपरिषदेत होणाऱ्या निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्याबाबत वरील तक्रारीचा अहवाल देण्यासाठी १५ जानेवारीहा कालावधी दिलेला आहे.
जिल्हाधीकाऱ्यांनी श्रीगोंदा दौऱ्यावर असताना, नुकत्याच प्रलंबित कामांवर भेटी देऊन, कामे मार्गी लावण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जिल्हाधिकारी यांनी आमच्या तक्रारींची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत व स्व: भेटी देऊन वस्तूस्तीती सुद्धा पाहिली आहे.त्यामुळे चुकीचा कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनावर व नेत्यांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
स्रोत:(टिळक भोस,संभाजी ब्रिगेड)
