दिनांक १३ जानेवारी,श्रीगोंदा:
बचत गटातून कर्ज घेऊन त्याचा विनियोग उद्योग व्यवसायसाठी करीत बाजारपेठ मिळविण्याचा येथील महिला उद्योजकांचा उपक्रम महिला सक्षमीकरणसाठी तसेच इतर महिलांना दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई पोटे यांनी चैतन्य महिला बचत गटाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त यशस्वी महिला उद्योजक सत्कार सोहळ्यात काढले. श्रीगोंदयातील चैतन्य महिला बचत गटाच्या पतसंस्थाच्या वतीने आयोजित सोहळ्यात सौ. पोटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी किसनराव आघाव होते.

सौ. पोटे म्हणाल्या कि, महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी काम करतात. विठ्ठलराव वाडगे, चेअरमन सौ. रुक्मिणीताई वाडगे आणि व्हाईस चेअरमन सौ. गौरी भोस यांनी चैतन्य महिला बचत गटाची पतसंस्था मार्फत ३ कोटीचे कर्ज वितरण करून, महिला सक्षमीकरणात पुढाकार घेतला. यातून महिला उद्योजक घडतील इतरांना प्रोत्साहन मिळेल.
सौ. गौरी भोस यांनी संस्था महिलांना व्यवसाय उभारणीसाठी कर्ज देते, त्यातुन परतफेड देखील वेळेत होत असून, संस्था भविष्यात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी योजना राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी बचत गटातून कर्ज घेऊन यशस्वी व्यवसाय करणाऱ्या सौ.रेखा डाके, सौ.शितल शेजुळ, सौ.शोभा घाटे, सौ.शीतल लांडे यांचा सत्कार करण्यात आला. महिला उद्योजक सौ.रेखा डाके, सौ.शोभा घाटे यांनी सत्काराला उत्तर देताना, चैतन्य महिला बचत गटाने कर्ज पुरवठा केल्याने व्यवसाय उभारला, आज आमच्या उत्पादनाला स्थानिक तसेच अमेझॉन कडून देखील मागणी होत असल्याचे सांगितले.
वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी संस्था कार्यपध्दतीची माहिती दिली. प्रदीप आठरे यांनी आभार मानले संस्थेच्या सौ. अश्विनी राऊत, रुपाली भणगे, दादासाहेब सकट यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.
स्रोत:(पत्रकार मुस्ताकभाई पठाण)
