दिनांक ८ जून,श्रीगोंदा:
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या आदेशावरुन नाभिक समाजाच्या मागण्यां- संदर्भात दिनांक ५ जून २०२० रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनाची शासनाने कोणतीही योग्य ती दखल घेतलेली नाही. म्हणून, उद्या दिनांक ९ जून २०२० रोजी संपूर्ण राज्यात होत असलेल्या आंदोलना प्रमाणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर शांतता प्रिय मार्गाने व शासकीय नियमांचे उल्लंघन न करता, लाक्षणिक आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन श्रीगोंदा तालुक्यातील नाभिक बांधवांनी तहसिलदार महेंद्र माळी यांना दिले आहे.
सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी किंवा दरमहा रुपये १०,००० / प्रत्येकी सलून व्यवसायीकांस (दुकान मालक व कारागीर) द्यावी, लॉकडाऊन कालावधीतील संपूर्ण लाईटबील माफ करावे, सलून व्यावसायीकांना विमा संरक्षण मिळावे.इत्यादी प्रमुख मागण्या समोर ठेवून, उद्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर करतेवेळी नाभिक महामंडळाचे इंद्रजीत कुटे, कांतीलाल कोकाटे, विजुभाऊ क्षिरसागर, राजेंद्र कुटे सह समाजबांधव उपस्थित होते.
