दिनांक ९ जुलै,श्रीगोंदा:
राष्ट्रीय अस्मिता असणाऱ्या राजगृह या ऐतिहासिक वास्तुवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी श्रीगोंदा तहसिल कार्यालय येथे आज दिनांक ९ जुलै रोजी तालुक्याच्या नायब तहसीलदार ढोले मॅडम यांना राजगृह हल्ला निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी (मानवाधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष) प्रमोद काळे,(सामाजिक कार्यकर्ते) राजेंद्र राऊत, सामाजिक कार्यकर्त्या मिराताई शिंदे, प्रेरणा धेंडे, रुपेश काळेवाघ, युवा उद्योजक निलेश गायकवाड, अॅड नितीन घोडके, आशुतोष चव्हाण, दिगंबर काळे आदी उपस्थित होते.
घटनेच्या निषेधासह सामाजिक भावना राज्य शासनापर्यंत पोहचवण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
(स्रोत: निषेध निवेदन व रुपेश काळेवाघ यांचे कडुन मिळालेली माहिती)
