श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी मेळावा; सिंचन, सिस्पे फसवणूक, कुकडी-घोड पाणी प्रश्नांसह अनेक मागण्यांचा पाऊस..

दि. २९ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात तालुक्यातील विविध विकासकामे, शेतकरी प्रश्न, सिंचन व्यवस्थापन, उद्योगधंदे, शेतमालाला भाव आणि शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

उपस्थित लोकं..

मेळाव्यास चंद्रशेखर घुले, आमदार काशीनाथ दाते, अशोक सावंत, रमेश थोरात, संग्राम जगताप, दत्तात्रय पानसरे, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, भगवान आबा पाचपुते, राहुल जगताप, अनिल ठवाळ, बंडु तात्या जगताप, शिवाजी गर्जे, लहू कानडे, अरुण तनपुरे, सचिन जगताप, संध्या सोनवणे, सतीश पाचपुते यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

🔹 घनश्याम शेलार यांनी प्रास्ताविक करताना अजित पवार यांना महाराष्ट्राच्या विकासाचे बहुआयामी नेतृत्व संबोधले. जिप आणि नगरपरिषद निवडणुकीत यश मिळवण्यासाठी लोकांची ताकद मागितली.

🔹 आण्णासाहेब शेलार यांनी सात जणांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती देत एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली.

🔹 राजेंद्र नागवडे यांनी सिस्पे फसवणूक, डिंबे-माणिक डोह, रस्ते, साखर कारखाने, कांदा भाव, कर्जमाफीवर उपाययोजना करण्याची मागणी केली.

🔹 राहुल जगताप यांनी कुकडी-घोड प्रकल्पातील अन्याय, साकळाई पाणी प्रश्न, MIDCमध्ये उद्योगांचा अभाव, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आणि गुटखा, बोगस दूधप्रश्नी कारवाईची मागणी केली.


🏛️ अजित पवार यांचे प्रभावी भाषण

उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या एकत्र येण्याचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे सामाजिक व सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी एकीची गरज असल्याचे सांगितले. सिंचन व्यवस्थापन सुधारण्याचे आश्वासन देत कुकडी, घोड प्रकल्प, डिंबे-माणिक डोह आणि साकळाई पाणी प्रश्न सोडवण्याची तयारी दर्शवली. शेतकऱ्यांना एआयचा (AI) वापर करण्याचे आवाहन करत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सांगितल्या. सहकारी व खाजगी साखर कारखान्यांमधील स्पर्धा, शेतीतील यांत्रिकीकरण, शेतमाल हमीभाव यावर भाष्य केले. सिस्पे आणि इन्फिनिटी फसवणूक प्रकरणात सावधानतेचा सल्ला देत प्रमाणित कंपन्यांत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. संत शेख महंमद महाराजांच्या चादरीचे दर्शन घेतल्याचा उल्लेख करून धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांचा गौरव केला.


🔍 चर्चिलेले प्रमुख प्रश्न

  1. कुकडी आणि घोड प्रकल्पातील पाणी वाटपातील तफावत
  2. डिंबे-माणिक डोह आणि साकळाई पाणी प्रश्न
  3. सिस्पे कंपनीची गुंतवणूक फसवणूक
  4. दालमिया कंपनी व प्रदूषणाचे प्रश्न
  5. संत शेख महंमद महाराज मंदिराचा विकास

सभेदरम्यान संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे यांनी कांदा आणि दूधप्रश्नी जोरदार निषेध नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरे यांनी केले. तर, बाळासाहेब नाहटा यांनी आभार मानून मेळाव्याचा समारोप केला.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी मेळाव्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

स्रोत:(शेतकरी मेळावा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading