“लोकशाही व संविधान रक्षणासाठी डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण: श्रीगोंदा शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा”

दिनांक २८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

९५ व्या वर्षी देखील समाज परिवर्तनासाठी झटणाऱ्या ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनी तीन दिवसीय आत्मक्लेश उपोषणाला प्रारंभ केला आहे. असंघटित कामगारांचे हक्क, लोकशाही मूल्ये आणि राज्यघटनेची अस्मिता अबाधित राखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक उपोषणाला संपूर्ण राज्यभरातून आणि विशेषतः श्रीगोंदा तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

राज्यात आणि देशात सध्या चाललेल्या अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, आणि लोकशाही मूल्यांची होत असलेली घसरण यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रत्येकासाठी हे उपोषण प्रेरणादायी ठरत आहे. सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीत झालेला अमर्याद साधनसामग्रीचा वापर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव या पार्श्वभूमीवर, डॉ. आढाव यांनी सत्यशोधक विचारसरणीचा आधार घेत लोकशाही वाचविण्यासाठी हा लढा पुकारला आहे.

डॉ. आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले स्मारक येथे एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश काळेवाघ आणि युवा उद्योजक प्रशांत साबळे यांनी या उपोषणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव आनंदकर, आणि ओबीसी तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे यांसारख्या अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लिहिलेल्या “शेतकऱ्याचा आसूड” या ग्रंथाचा उल्लेख करत, सध्याच्या भ्रष्टाचारी परिस्थितीवर आसूड ओढण्याची गरज असल्याचे निशांत लोखंडे यांनी सांगितले. “डॉ. आढाव यांच्यासारखा वयोवृद्ध नेता जीवाची पर्वा न करता लोकशाही मूल्यांसाठी लढतो आहे, हे श्रीगोंदा शहरातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे,” असे त्यांनी पुढे म्हटले.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीत कोणत्याही विशिष्ट लाटेचा प्रभाव नसताना महायुतीला मिळालेल्या विजयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मतदान केंद्रांवरील गोंधळ, ईव्हीएममधील तांत्रिक शंका आणि निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळे लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. डॉ. आढाव यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर होण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी या उपोषणाद्वारे सरकारला संदेश दिला आहे.

स्रोत: प्रसिद्धी पत्र

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading