दिनांक १६ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मनोहर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला.

यावेळी त्यांनी सांगितले की, “संपूर्ण भारतात रविवारी सुट्टी जाहीर होण्यामागे बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांसाठी रविवारचा दिवस सुट्टीचा जाहीर करून त्यांना हक्काचा विश्रांतीचा दिवस मिळवून दिला. बाबासाहेब हे केवळ एक नेता नव्हते, तर ते महान विचारवंत, कायदेपंडित व समाजसुधारक होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर चालत आपले जीवन घडवावे.”

या कार्यक्रमात प्रा. प्रविण नागवडे, प्रा. मनोहर उंडे, प्रा. अमोल बोराडे, प्रा. मिथिल वाईंगडे, प्रा. अतुल खामकर, प्रा. मोहन खोमणे यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद बेडसे यांनी केले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
