दिनांक ५ एप्रिल(भानगाव,श्रीगोंदा):
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अनेकांचे उद्योग, संसार आणि जीवनच उघड्यावर आले आहे. अशात काहींच्या स्वप्नाचा चुराडा झालेला दिसतो. तर, काही आपल्या जीवापासून हात धुऊन बसले आहेत. कोणाचे वडील कोणाची आई, भाऊ, बहीण अशा अनेक नातेसंबंधातील वेगवेगळे धागे तुटून पडले आहेत. प्रत्येकाच्या दुःखाची तीव्रता गंभीर आहे. यातच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन एमपीएससीची तयारी करणाऱ्या भानगाव, श्रीगोंदा येथील एका युवकाचा कोरोणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील भानगाव येथील रहिवासी वैभव शितोळे याचं DySP होण्याचं स्पप्न करोनामुळे भंग पावलं आहे. या महामारीत वैभवचं निधन झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार व संबंधित दुःख व्यक्त करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैभव मागील ७ -८ वर्षां पासून पुण्यात एमपीएससीची तयारी करीत आहे. यापूर्वी अनेक परीक्षा त्याने दिल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने एमपीएससी परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सदरील परीक्षा पुढे ढकलन्यात आल्या होत्या. यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. नमूद आंदोलनात तो सहभागी झाला होता. काही दिवसांत त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला. त्यामुळं त्याला परीक्षा देखील देता आली नाही. उपचारास तो प्रतिसाद देत होता. मात्र, अचानक खालावलेल्या प्रकृतीमुळे त्याचा दिनांक २ एप्रिल शुक्रवार रोजी दुर्दैवाने मृत्यू झाला.(Due to Corona … the dream of a young man from Shrigonda to become a DYSP remained unfulfilled …)
वैभवने नाशिकमध्ये त्याची इंजिनियरिंग पूर्ण केली होती. त्याचे आई, वडील आजही शेती करतात. वैभव व एक बहीण असा त्यांचा परिवार होता. बहिणीचे नुकतेच लग्न झाले असून, संबंध लॉकडाऊनमध्ये वैभव आपल्या गावी आलेला नाही. त्याच्या अकस्मात जाण्याने गाव, परिसर, मित्र परिवार सह नातेवाईकांमध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.
स्रोत:(ऑनलाईन न्युज)
