दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात लग्नसराईच्या हंगामात एका लग्नाचा आगळावेगळा प्रकार उघडकीस आला आहे. एका गावातील तरुणाचे आळंदी येथे विवाह पार पडले असताना सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात एका महिला नातेवाईकाने वधूला पाहताच धक्कादायक माहिती उघड केली. वधूने मागील वर्षी तिच्या मुलाशी लग्न करून दोन लाख रुपये घेऊन पलायन केल्याचे तिने सांगितले. हे ऐकताच बनावट वधू व मध्यस्थाने कार्यक्रमातून धूम ठोकली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वराकडील मंडळींनी मध्यस्थाकडे पैसे परत मागितले, मात्र त्याने नकार दिला. समाजात बदनामी होऊ नये म्हणून संबंधितांनी पोलिसात तक्रार न दाखल केल्याची माहिती आहे. याप्रकारात लग्न जमवणाऱ्या टोळ्या मुलांच्या नातेवाईकांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले असून अशा घटना वाढल्याचीही चर्चा सुरू आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)




