फकिरा..
मारली ,
” गावकर , मी दौलती हातं हाय
पंत नकळत वळून दौलतीकडे गेले आणि त्याच्यापुढं निश्चल उभे राहिले . हजारो लोकांच्या दावणीत दौलतीला बांधलेला होता . राधाबाई , म्हातारी राहीबाई , तरुण सरू आणि आपल्या गावची ती मांग पाहून पंतांना भडभडून आलं . ते घोगऱ्या आवाजात म्हणाले , ” आलिया भोगासी सादर असावं . मी साहेबाशी बोलून पाहिलं ; परंतु फकिरा हजर होईपर्यंत तुम्हाला त्यांनी ओलीस ठेवलं आहे , सोडणार नाही , असं म्हणतात . दौलती , धन्य तुझी ! किती घाव घेत राहणार तू ? खरंच , तू वज्रदेही आहेस ! “
. ” आवा ! ” दौलती कापऱ्या स्वरात म्हणाला , ” ही माझी नातसून कैदी हाय नि तिच्या पोटात बाळ हाय . त्ये बी कैदी हाय . ही सारी म्हातारी , पोरं , साऱ्यास्नी हे दिस यावं , असं काय पाप केलंय ? …
‘ आता रडू नका , ‘ पंत म्हणाले , ‘ फकिराची भेट घेऊन त्याला सांगतो ”
नगा , नगा ! ‘ राधा केविलवाणा चेहरा करून म्हणाली , ” आमी अस्सं मरू , पन त्येला म्हनावं , तू हजर होऊ नकं . ‘
” हो , हो– नकं , ” दौलती म्हणाला , ” आमचं काय उरलंय ? पन बाबून हजर व्हायला नकं . आमची काळजी करू नकं , म्हणावं .
दौलती , राधा बोलत होती . राही खाली मान घालून रडत होती . सरूचे डोळे रडून सुजले होते . तो प्रसंग तिला नवाच होता . पंत निघाले , तेव्हा सरूनं त्यांच्या पायांपुढं बंदिस्त हात टेकून नमस्कार केला आणि पंतांनी उपरण्यानं डोळे पुसले .
” जावा , दिस बुडंल ” दौलती मिश्या सरळ करीत खणखणीत आवाजात म्हणाला .
पंत घरी आले , परंतु आज त्यांना कशातच बरं वाटत नव्हतं . ते आज जेवलेही नाहीत . नेर्त्यांच्या माळाची ती माणसांची स्थिती , ते हाल , तो अन्याय , यानं त्यांचं मनच विटलं होतं . या राज्यात हा एवढा भयंकर अत्याचार व्हावा , हे त्यांना मान्य नव्हतं . आपण प्रत्यक्ष यमपुरीच पाहून आलो आहोत , असं त्यांना वाटत होतं .
लगीला लटकणारा कंदील शांत जळत होता . सोप्यात पंत एकटेच बसले होते . सर्वत्र सामसूम होती . निम्मी रात्र होत आली होती . पंत उदास झाले होते . त्यांच्या पल्लेदार करड्या मिश्या पिंजारल्या होत्या . हे उघडेच बसले होते . आज आपणास झोप येणार नाही . याची त्यांना कल्पना आली होती . आपल्याला फकिरा कसा भेटणार , हा प्रश्न त्यांच्या मनात डाचत होता ,
इतक्यात अंगणात पावलं वाजली . पंत चमकून पाहू लागले आणि बापू खोत वा त्याचा जावई रावसाहेब पाटील सोप्यात आले . त्यांना पाहून पंतांना आश्चर्य ” वाटलं . त्यांनी विचारलं , ” असे अपरात्री इकडं कुठं ? ‘
” तुमच्याकडेच . ” खोत म्हणाला , ” मांग लोकांस्नी सोडावं , म्हणून तुम्ही रदबदली करायला गेला होता , असं मला समजलं- “
” खोटं ! ” पंत म्हणाले , “ सरकारनं मला गावकामगार म्हणून बोलावणं केलं होतं . त्याचप्रमाणं मी गेलो होतो- “
” असं असं ! ” खोत म्हणाला , ” ठीक , आता पुढेमागे तशी रदबदली करू नका . कारण त्यास्नी मदत करू नका , एवढंच आमचं सांगणं- “
” मी कुणाचं सांगणं ऐकत नाही ! ‘ ‘ पंत एकदम चिडून गरजले . ” मला विनंती करा . सांगणं सांगणारे तुम्ही कोण ? आणि कुणासाठी मी रदबदली करावी की न करावी , हा माझा प्रश्न आहे ! ”
“ पंत , ऐका- ‘ ‘ रावसाहेब पाटील गुरकला , ” असं तरकटू नगा . ही गावपांढर माझी हाय . ह्या पांढरीत नांदायचं असेल , तर सरळ नांदा ! न्हाय तर- ‘
” नाही तर काय करणार ? ” पंत मध्येच ओरडले आणि पाटील म्हणाला , ” आमीच तुमास्नी सरळ करू- ‘
‘ असं ? ‘ ‘ पंत शांत होऊन म्हणाले , ” तर मग आता ज्योत्यावरून प्रथम खाली व्हा ! चला ! “
” आवं , पर ऐका- ” खोत म्हणाला आणि पंत पुन्हा ओरडले ,
” प्रथम येथून चालते व्हा !
” बापू खोत नि पाटील निघून गेले आणि पंतांचं मन पुन्हा पेटलं . तो प्रकार त्यांच्या आयुष्यात नवाच होता . आता आपलंही जीवित सुरक्षित नाही , याची त्यांना कल्पना आली . आणि ते खिन्न होऊन पुटपुटले ,
” माणसानं इतकं दुष्ट आणि इतकं मूर्ख नसावं !
” बाहेर रात्र निम्मी होत आली होती . कंटाळा आला , म्हणून अंग टाकण्याचा विचार करून पंत उठले , तोच फकिरा सोप्यात आला . पाहताच त्यांचा कंटाळा नाहीसा झाला . दाट भुवया चढवीत आश्चर्यानं ते म्हणाले ,
” फकिरा , इकडं कुणीकडं ? आणि एकटाच ? ”
” त्ये का ? – ” फकिरा म्हणाला , ” आपली सारी फौज घेऊन आलोय ! ”
” असं ? ” पंत बाहेर पाहत उद्गारले , खंडू , साधू , पिरा , घमांडी उभे होते . बाकीची सर्व माणसं फकिरानं गावंदरीला निरनिराळ्या जागी टोळ्या करून बसविली होती आणि निवडक माणसं घेऊनच तो गावात आला होता . अंगणातील पाच – सहा गडी पाहून पंत म्हणाले , “ फकिरा , तुझे वैरी जागोजागी टपून आहेत . तू असा एकट्यानं वावरणं धोक्याचं आहे ! “
” खरंच पन्नास गडी संगं घेऊन आलोय ! ” फकिरा म्हणाला , शेवटचा आशीर्वाद द्या
” थांब- ” पंत डोकीवर मंदिल ठेवून म्हणालो , ” चल , दूर रानात जाऊ . ” मलाजरा बोलायचं आहे . मी आजच छावणीकडून आलो . ते सारं सांगतो तुला- ‘ ‘ असं म्हणून ते अंगण उतरून चालू लागले आणि फकिरा त्यांच्यामागे निघाला . उशीर चालून गावाबाहेर आल्यानंतर पंत एका आंब्याखाली बसले . ऐसपैस बसून चिंतायुक्त स्वरात ते बोलू लागले आणि फकिरा पुढं बसून ऐकू लागला . पंत म्हणाले ,
” सरकारी विचार निर्वाणीचा झाला आहे . ते तुला कैद करूनच दम घेणार , असं वाटू लागलं आहे . तू हाती यावास , म्हणून त्यांनी आकाशपाताळ एक केलं आहे . हजारो निरपराध लोकांना पकडून माळाला डांबून टाकलं आहे . माणसं टाचा घासून मरणाची वाट पाहत आहेत . माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो सर्व प्रकार पाहून- “
” ” मला ह्येच कळेना- ” फकिरा म्हणाला , ” मला कैद करन्यासाठी सारा नूख धारंवर का धरलाय ? “
” मी छावणीत हा प्रश्न विचारला . ‘ पंत गंभीरपणे म्हणाले , ” तेव्हा जॉनसाहेबानं उत्तर दिलं , की नाक दाबल्यावर तोंड उघडतं ! यावर मी सवाल केला , की दुःख तिथं डाग द्या
” मंग काय म्हनाला त्यो ? ” बळीनं चटकन विचारलं आणि पंत उत्तरले ,
” ते म्हणतात , दिव्य औषधीनं बऱ्या न होणाऱ्या रोगांवर शस्त्रक्रियाच करणं प्राप्त आहे . म्हणून त्यांनी तुझी सर्व माणसं पकडून आता ओलीस ठेवली आहेत . जोपर्यंत तू हाती येत नाहीस , तोपर्यंत कैद झालेला एकही माणूस मुक्त होणार नाही , ही दगडावरची रेघ आहे ! ”
” छावनीत आमचं कोन दिसलं का तुमाला ? ‘ ‘ फकिरानं विचारलं .
” सर्वच दिसले नि भेटले . ‘ पंत उत्तरले .
” आई ?
“हो.
” ‘ आबा ? ”
” तोही .
‘ ‘ नारू म्हातारा ? “
” सर्वच भेटले . ” पंत वैतागून म्हणाले , ” त्या प्रसंगाची आठवण नको ! माणसांना इतकं क्रूरपणे वागवल्याचं दुसरं उदाहरण नाही ! तरणी , म्हातारी , पोरं सर्वांना ओळीनं एकाच दावणीत गुरांप्रमाणं डांबलं आहे . ती छावणी नव्हे – फकिरा , यमपुरी उरली आहे त्या माळाला ! येताना मी दौलती , राधा यांना भेटून बोलून आलो . सूनबाईच्या हाताच्या दोऱ्या पाहून काळजाला आग लागली !
पंत एकदम थांबले . पुढचे शब्द जणू त्यांना आठवत नव्हते . उशीर कोणीच बोललं नाही . सर्वांच्या चमूंपुढं छावणी उभी राहिली .
” आई काय म्हनली ? ” फकिरानं विचारलं .”
” ‘ त्या सर्वांचं मत आहे , की तू सापडू नयेस ! ” पंत म्हणाले , ” त्या सर्वांनी आता दुःखाला पाठ दिली आहे … पण … ‘
” पन काय ? “
” पण पंत म्हणाले , ” तू हजर व्हावंस , असा साहेबांचा आग्रह आहे नि तू हजर होईपर्यंत ती माणसं जगण्याची आशाच नाही ! “
” मग मी काय करू ? “
” तुम्ही हजर व्हावं .
” मी हजर व्हायचं ? “
” एकट्यानं नव्हे ‘
मग कुनी कुनी ? “
” फकिरा , पिरा , मुरा , बळी , तायनू , सावळा , हरी , खंडू , भिवा- ‘ पत म्हणाले ,
” आणि दहावा घोंचीकर बळी सकाळीच कैद झाला .
” कैद झाला ? ” सर्वच चमकून उद्गारले आणि पंत म्हणाले , “
म्हणजे त्याला कैद केला . त्यानं क – हाडच्या कृष्णा पुलावर लष्कराशी गर्दी केली ; परंतु कैद झाल्यानंतर शिपायांनी व खोतानं त्याची दाढी उपटून काढली . तो मला दिसला , तेव्हा प्रथम मी त्याला ओळखलंच नाही . तो जखमीही झाला आहे .
” ” मग घात झाला ! ” फकिरा म्हणाला , ” आता जगन्यात राम उरला न्हाय . आता मरन्यात जन्माचं सार्थक व्हनार हाय ! बळी … ” असं म्हणून फकिरा नेर्त्याच्या रोखानं वळून पाहिलं आणि चटकन उठून तो पुन्हा म्हणाला , ” आबा , मी उद्याच ती छावनी गारद करनार ! “
” छावणी मारून काढणं कुवतीबाहेरचं आहे . ‘ ‘ पंत म्हणाले , ” लष्कराशी तुम्ही कशी झुंज देणार ? तिथं बखतबंद लोकांची फौज आहे . “
” असेल ! ” फकिरा मध्येच म्हणाला , ” मी कत्तल करीत करीत कटून जाईन ! हजर होऊन वैऱ्याहाती मान देन्यापरास मरनारलाच जीव देऊन मोकळा व्हयीन- “
“ परंतु पुढं काय ? ” पंत म्हणाले , ” आठ लोकांची गर्दन जाणं नि आठशांनी कत्तल करून घेणं , यातून कोणतं ठीक दिसेल , ते कर ; परंतु लौकर कर आणि त्या गोरगरिबांचे प्राण वाचव ! तो खोत , तो कबीरा , हा पाटील हे इरेलाच पडले आहेत . माझंही जीवित धोक्यात आहे , फकिरा ! आत्ताच मला खोत धमकी देऊन गेला ! ”
“ मी वाईच इचार करतू . ” फकिरा म्हणाला , ” साऱ्यास्नी इचारून , काय करायचं , त्ये नक्की करून मग मी तुमाला भेटतो . ‘
” ठीक . तसं कर ! ” पंत म्हणाले आणि उठले व घराकडे निघाले . फकिरा…
क्रमशः.
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
