फकिरा..
कुणाच्या ?
चौघुल्याच्या ..
” चल माग ” असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू एकदाही मागे वळून बघितलं नाही . चिंचेखाली गाडी करकरली नि थांबली . राधाही लागली . राधा आपोआप गाडीमागून परत निघाली . चिंचेखाली येईपर्यंत शंकररावान एकदाही माग वळून बघितल नाही.चिंचेखाली गाडी करकरली आणि थांबली.राधाही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, ” दोलती आहे. का घरात?
शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दोलती पुढं आला . पाटील , राधा यांना पाहून तो एकदम पुढे येऊन म्हणाला
मी आत्ताच सोनाटकीतून आलो शिंगरू न्यायला..
” ठीक . दौलती , पण हे बरं नाही- ” पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला , ” चौधुल्याच्या . काघरात ? ” यांना पाहून तो एकदम तरातरा पुढं येऊन म्हणाला , ” मी आताच सोनाटकीतनं परत आलो शिंगरू न्यायला . – मारील . हिला रोजगाराला कधीच पाठवू नको . तुला दाणे हवेत- हे घे . ‘ असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला .
” एक , दोन , तीन – ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय , असं वाटून दौलती म्हणाला , ” गावकर , पुरं , पुरं .
” पुरं ? तर ऐक . राधाला कष्ट देऊ नको . तिच्या कुंकवानं डोंगराएवढं कष्ट भोगलं – आणि ते माझ्याच शब्दावर भोगलं . मी पाटील ! मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं , इथं या पांढरीत जत्रा भरावी , गावावर उपकार करावा , म्हणून तो दोन पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला . त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली , तर आम्ही सारे नरकात जाऊ.जे पेरावं ते उगवतं !
” पाटील , असं कसं म्हणता ?
” ” बरोबर म्हणत आहे मी . दाण्याची पोती देणं आणि शिर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही . दाणं शेतात पिकतात – शिरं पिकत नाहीत , दौलती ! खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला , त्याची ही अब्रू आहे . ही जगाच्या मोलाची आहे . माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही .
” ” म्हणूनच मी जगलो ! ” दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या ओठांना थांबवीत म्हणाला , ” नाही तर मी मेलो असतो . पण तुमच्या – पंतांच्या बोलानं मला तारलं . आजपासनं राधाला मी कुठं पाठवनार न्हाय ! “
” एवढंच कर . ” असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं नि बैल चालू लागले . राधा घरात गेली . तिनं उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला .
दौलतीनं दोन माणसं बोलावून पोती घरात नेली . शिंगराचं दावं सोडून तो निघाला . तोच फकिरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला . दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला , “ ये म्हाताऱ्या , कुठं नेतोस त्येला ? “
” रानात चरायला – का ?”
” नकं , घरातच बरं हाय त्ये ,
” अरं , पर का ? चाराय का नकं ? “
” नकं . त्यो गबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आनि तू ह्या गबऱ्याला रानात येऊन मारशील . काय नेम तुझा !
” हे ऐकून दौलती गालात हसला . हसऱ्या नजरेनं पाहत तो म्हणाला , ” खरं हाय तुझं . सांभाळ आपला गबऱ्या . मी जातो रानात . ” असं म्हणून तो गेला . राधानं फकिराला हाक मारली आणि विचारलं , ” आज्याबरं का भांडलास ? “
” त्यो गबऱ्याला रानात नेत व्हता .
” म्हणून काय झालं ? काय बिघडलं ? “
” आगं , म्या थट्टा केली त्येची . “
” म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये . ” असं म्हणून ती हासली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं . तो दहा वर्षांचा बांधेसूद उंच फकिरा आपल्या आईच्या काखेत बसला , तेव्हा त्याला गगन गिडुं वाटलं ; परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली .
” आई ! “
” काय ? “
” आबाला खोतानं मारलं ? “
” हो – मारलं . “
” आपला गबऱ्या मोठा झाला , की मी खोताला मारीन . “
” तवर त्यो म्हातारा होईल . ” तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला . साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते . तो कमी बोले .
दुपार झाली . भाकरी खाऊन फकिरा व साधू घराबाहेर पडले . राधा कामात गुंतली .
सूर्य डोकीवर आला . सावल्या पायात घोटाळू लागल्या . हिरवं शिवार उन्हाच्या मुलाम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं . ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं . चिंचेखाली फकिरा नि साधू यांनी खेळ मांडला . फकिरा म्हणाला ,
” आपून कुरघोडी खेळू या . ” ” खेळू या .
” साधूनं मुंडीनं होकार दर्शविला . फकिरा चिंचेच्या बुडख्याआड गेला आणि दोन मुठी झाकून पुन्हा परत आला . एकीत शेळीची लेंडी नि दुसरीत चिंचोका होता . त्या दोन मुठी साधूपुढे धरून तो म्हणाला ,
” लेंडी , का चिंचुका ? “
” चिंचुका . ” साधूनं फकिराची डावी मूठ धरली नि त्यानं ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला , ” लेंडी ; हा बघ चिंचूका . ” असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडून चिंचोका दाखवला . साधूवर डाव आला . तो वाकला . फकिरा त्याच्या पाठीवर बसला . कुरघोडीचा खेळ सुरू झाला .
किती अंडी ? बोल ! ” असं म्हणून फकिरान साधूच्या पाठीवर बसून आपल्या ” आर घोडी- पार घोडी , तुणतुण्याची तार तोडी , सायबाच्या बंगल्यात उजव्या हाताची तीन बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरपडत फकिराचा फकिरानं खाली उतरून त्याला ती तीन बोटं दाखवला . पुन्हा साधूवाकला तुणतुण्याची तार तोडी , सायबाच्या बंगल्यात किती अंडी ? बोल ! ” या खेपेला त्यानं फकिरानं खाली येऊन त्याला एक बोट दाखवलं . ते पाहून साधू | आणि फकिरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला , “ आर घोडी – पार घोडी एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला , ” तीन ऽ तीन 5 तीन . ” भार आवरत म्हणाला , ” पाच – पाच ! “
हिरमुसला , नि पुन्हा वाकला . पुष्कळ उशीर त्यांचा खेळ चालला होता . साधूवरचा डाव फकिरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता . त्याची कंबर दुखायला लागली होती . तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता ; पण फकिरा त्याला सोडीतच नव्हता . साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकिरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता . साधू रडकुंडीस आला आणि राधा बाहेर आली . फकिरा साधूच्या पाठीवर बसला होता . साधू तिरपडत त्याला आवरीत होता . फकिरा अंडी सांगत होता . हे सारं पाहून तिला राग आला .
” आर घोडी – पार घोडी , तुणतुण्याची तार तोडी , साहेबाच्या बंगल्यात किती अंडी ? बोल ! ” फकिरानं चार बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला , ” सातऽ सातऽऽ ‘
‘ राधा पुढं येऊन रागात म्हणाली , ‘ फकिरा , त्येला बोटं किती , ह्ये कळंना , तो सायबाच्या बंगल्यातली अंडीरं कशी सांगणार ? दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारनार ? बघ की त्यो घामानं उपळून निघाला.
” ” मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो , म्हंजी ? “
” त्ये का ? तू शहाना हाईस . त्येला कळत न्हाय .
” आनि माझ्या पाठीवर बसला , तवा ? “
” मग काय झालं ? तू तरी सांगशील का किती अंडी ? “
” हो – हो . सांगीन !
” मग सांग तर . वाक ! ” राधा इरेला पडली .
” ह्ये बघ वाकतो . ” तोही ईयेला पेटला .
” बस रं साधू त्येच्या पाठीवर . बघू कसा सांगतोय , त्ये ! ” राधा म्हणाली .
फकिरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला . मग तोही म्हणाला , ” आल घोडी : पाल घोडी ऽऽ तुनतुन्याची ताल तोडी 5 सायबाच्या बंगल्यात किती अंडी ? बोल ! ” असं म्हणून त्यानं बोट उंच धरली , तेव्हा फकिराची नजर भुईवर होती . साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती . त्यानं किती बोटं धरली आहेत , हे फकिराला दिसत होतं . तो पटकन म्हणाला , ” दोन ऽ दोन ऽऽ ! उत्तर खाली . “
राधाला नवल वाटलं . तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं . ती म्हणाली , ‘ नको , रे बाबा असला खेळ . तू मोठा धोरणी हाईस . “
” मग माझा डाव दे की ! “
” न्हाय डाव आता . “
” न्हाय – माझा डाव दिलाच पायजी ! “
” नकं – त्यो रडकुंडीला आलाय . “
” न्हाय . माझा डाव ! ” फकिरा संतापला . त्याचे डोळे भरून आले . आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे , याची त्याला चीड आली . तो पाय आपटून म्हणाला , ” आईऽऽ , माझा – डाव !
” ती गर्रकन फिरली . फकिरा रडत होता . साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली नि फकिराला पाठीवर घेऊन म्हणाली , ” मी तुझा डाव देते . बस . ‘ ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली .
सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता . पश्चिमेला सात दऱ्यांच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता . त्या ढगात गालिच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता . डोंगरातील कीर झाडीनं शिरण्यासाठी अंग आवळून घेतलं होतं .
दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती . गुरं हंबरत होती . बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालले होते . गावचे कष्टच जणू फळाला आले होते .
राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली . साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला . रुसका चेहरा करून फकिरा कोपऱ्यात पाहत होता . राहीबाई शेरडं घेऊन आली होती . राधा साधूशी बोलत होती , ” तू आपल्या आजोबासारखा हाईस . आन ह्यो फकिरा आपल्या वडलावानी हाय . आजोबा म्हनत , ‘ आम्ही तलवार घेऊन , भीक मागून जमात जगवली . ‘ ते ऐकून तुझं वडील हासत . खरं म्हंजी त्येंना रागच येई , पण हासून दाखवीत.
” ” आमच्या आबाला शिव्या देऊ नकं ! ” फकिरा रडक्या आवाजात गुरगुरला , आणि राधा हसली . ती काही तरी बोलणार , तोच राहीबाई म्हणाली , ” फकिरा ! ती का शिव्या देतीया ! किती आगरस्ताळा तू ? “
” आमच्या आबाचं नाव का काढतीय ? ” ” मग काय झालं ? सारखी धुसफुस करू नये . ” असं म्हणून तीच राधाला म्हणाली , ” बाई , तू बी त्याला चिडवू नकं. खोडीला औषध नसतं .
” राधा हसली . तिनं फकिराला जवळ घेतलं , ” मी थट्टा केली तुझी . ‘ तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला . पुन्हा ती..
क्रमशः
स्रोत:(फकिरा या अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतुन)
