शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकारी नेते राजेंद्र म्हस्के यांचे आमरण उपोषण..

दिनांक २ नोव्हेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यामध्ये सातत्याने गेल्या चार महिने पासून पाऊस चालु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व फळबागाचे फार मोठे नुकसान झाले आहे.शासनाच्या मोजमापाप्रमाणे एकदाच मोठा पाऊस झाला तरच, पंचनामे केले जातात. परंतू, दिर्घकाळ पावसाने तालुक्यातील कपाशी, कांदा, कांद्याचे रोपे तसेच मका,तुर,लिमोणी व डाळिंब तसेच द्राक्षे यांचे फार मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फटका बसला आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

अजूनही तालुक्यात अधून मधून पाऊस येतच आहे. तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत आवश्यक असून, त्यांना तातडीने हेक्टरी ५०,०००/- मदत मिळावी. तसेच, श्रीगोंदा शहरापासून तालुक्यात कोणत्याही गावात जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे. मोटार सायकल व चारचाकी वाहन चालविताना फार मोठी कसरत करावी लागते. सध्या ऊस वाहतूक सुरु असून ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहने यांचे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. रस्त्यावर फुट ते दोन फुट असे खड्डे पडले आहेत. तरी या सर्व रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजून रस्ते दुरुस्त करावे.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले कपाशी पिक श्रीगोंदा येथील मार्केट मध्ये विक्रीस आणल्यानंतर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावा प्रमाणे व्यापारी बाजारभाव देत नसून व्यापारी त्यांची लूट करत आहेत. तरी ही लूट तातडीने थांबवून, व्यापारी यांना त्याप्रमाणे कापूस खरेदी करणेस सुचना द्यावेत व व्यापारी ऐकत नसतील तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत व तालुक्यात कापूस,बाजरी,मका या पिकांचे खरेदी केंद्र सुरू करावेत.तसेच, श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना व्यक्तीगत कामासाठी लागणारे फेरफार व रेकॉर्ड हे आवश्यक असतात, परंतु ते मिळविण्यासाठी त्यांना श्रीगोंदा तहसील विभागामध्ये चकरा माराव्या लागतात. वेळेवर कोणतेही रेकॉर्ड अगर फेर उपलब्ध करून दिले जात नाहीत.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक झळ बसत असून, वेळही वाया जात आहे.तरी बेशिस्त चालले कामकाज ताबडतोब थांबून सर्व संबंधित व्यक्तींना सूचना देवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी व नागरिकांना न्याय द्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यामध्ये फळ बागांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये लिंबू प्रामुख्याने येत असून प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान १०० झाडा पासून २००० झाडा पर्यंत लिंबू झाडे आहेत. तरी शासनाने लिंबू हे फळ बागातून ओघळलेले आहे. त्यामुळे त्याचा विमा काढता येत नाही व नुकसान भरपाई मिळणेस अडचण येत आहे.तरी लिंबू हे झाडे(पिक) फळ बागेत सामाविष्ट करणेत यावे.

सर्व प्रश्न सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी नेते,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आबा म्हस्के हे सोमवार दि.२ नोव्हेंबर,सकाळी १०:०० वाजे पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

स्रोत-नितीन रोही (पत्रकार)यांनी दिलेली माहिती

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading