सिमेंट वाहतुकीच्या वादातून पाटसमध्ये गोळीबार; श्रीगोंदा तालुक्यातील टोळीसह या १८ जणांवर गुन्हे, १० अटक..

दिनांक ६ जून २०२६ पाटस/श्रीगोंदा:

श्री सिमेंट कंपनीत ट्रक भरण्याच्या कारणावरून “कडू गट” आणि “कुऱ्हाडकर गट” यांच्यात लोखंडी गज आणि दगडांनी तुफान हाणामारी झाली. यानंतर गावठी पिस्तूलमधून ३ राऊंड हवेत फायर करण्यात आले. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोन्ही गटांतील १८ जणांवर BNS कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करत १० आरोपींना उसाच्या शेतातून अटक केली आहे.

संतोष बाळकृष्ण कडू (दौंड) व आण्णा गायकवाड, रावसाहेब पालवे, सुधीर फुलमाळी, रामा गायकवाड, अनिल गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि ४ ते ५ अनोळखी.

सूरज कुऱ्हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण (सर्व रा. पाटस, ता. दौंड) आणि ३ ते ४ अनोळखी.

चर्चेसाठी जमले असताना दोन्ही गटात वाद झाला. अजय धोत्रे याने संतोष कडूच्या दिशेने गोळीबार केल्याची तक्रार आहे. लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्समधील एका माजी सरपंचांच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयातून वादाची ठिणगी पडल्याचा संशय आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील गुंडप्रवृत्तीची टोळी येथे कोणी बोलावली? आणि मुख्य सूत्रधार कोण? याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे करत आहेत. वाढत्या सिमेंट व ट्रान्सपोर्ट लॉबीच्या गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading