हॉटेल वेटर ते द्राक्ष बागायदार..

कोळगाव मधील पांढरेवाडी शिवारात वडिलोपार्जित १४ एकर शेती होती पण खाण्यापुरती ज्वारी पिकत नव्हती असा सन १९८९ दहावी फेल झालेल्या शरद भिवसेन भोयटे यांनी पाटसला मावस भावाच्या हॉटेल वर १४ वर्षे वेटर म्हणून काम केले. सन २००१ ला विसापूर फाट्यावर छोटेसे हॉटेल सुरू केले. पण अंगात शेतकऱ्याच रक्त असल्याने ओढा शेतीकडेच २० एकर जमीन खरेदी केली आणि मोहरवाडी तलावावरुन पाणी आणले पांढरेवाडीच्या माळरानावर द्राक्ष संत्रा आणि कढीपत्ताचा मळा फुलविला आहे.

शरद भोयटे यांचे आई वडील कोरडवाहू शेतकरी मुलांनी शिकावे अशी आई वडीलांची इच्छा पण दहावी नापास झालो आणि आयुष्याची वाट बिकट होते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत एक वर्ष गुर ओळली आणि नंतर मावस भावाने हॉटेल वर वेटर म्हणून कामास नेले. टेबल पुसता पुसता माणस समजली अनुभवाची शिदोरी मिळत गेली. माझी आई जनाबाई हीची शिकवण होती तु काहीही कर पण व्यसनापासून चार हात लांब राहा तर तुझं भलं होईल चार माणस चांगल म्हणतील.

मनिषा या मुलीबरोबर माझा विवाह झाला विसापूर फाट्यावर भिमाई नावाने छोटे हॉटेल सुरू केले. मनिषाचा माझ्या जीवनात प्रवेश झाला आणि प्रगतीची झेप सुरू झाली. ऋतुजा, अमृत आणि समर्थ ही तीन मुल झाली. २० एकर जमीन पांढरेवाडी खरेदी केली पण कोरडवाहू शेती त्यामुळे शेतीत नफा मिळणे अवघड होते. अशा परिस्थितीत नगर दौड रोडच्या बाजूला घेतलेली दोन एकर जमीन विकली आणि ४५ लाख खर्च करून मोहरवाडी तलावावरून पाईपलाईन केली मोहरवाडी च्या पाण्याने पांढरेवाडीतील शेतीत जान आली या पाण्यावर तीन एकर द्राक्ष तीन एकर संत्रा एक एकर लिंबोणी आडीच एकर कढीपत्ता लागवड केली गुरांसाठी चाऱ्याची पिके केली आहे त्यामुळे पांढरेवाडीतील कोरडवाहू मळा हिरवागार झाला याचे मनात मोठे समाधान आहे.

शेतीला हक्काचे खत मिळण्यासाठी निलेश जाधव यांच्या गोटफार्म मध्ये भागीदारी केली आहे. याभागीदारी दुहेरी फायदा होऊ लागला आहे. भविष्यात दहा एकर द्राक्ष बाग करून पूर्ण वेळ शेती करणार आहे. तसे नियोजन केले आहे.

संदेश

सध्या सर्व क्षेत्रात कमालीची स्पर्धा झाली आहे त्यामुळे जीवनात श्रम आणि व्हिजन शिवाय काहीच मिळणार मुलांना शेतीत लाईफ घडविण्याची मोठी संधी पण शेतीकडे धंदा म्हणून पाहाणे आणि जीवलावून काम केले तर यश निश्चित मिळेल हा माझा अनुभव आहे. शरद भोयटे पांढरेवाडी

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading