राज ठाकरेंच्या दृष्टीकोणातुन होणार ढोरजा व बांगर्डे गावचा विकास..

दिनांक १६ फेब्रुवारी,श्रीगोंदा:

तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील दोन ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला. सरपंच पदांची निवड झाल्यानंतर मनसेच्या या दोन सरपंचांनी थेट कृष्णकुंज गाठुन आपल्या नेत्यांचा आशिर्वाद घेऊन नवनिर्माणासाठी पाठबळ मागितले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत ची माहिती पक्षाचे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल कोठारे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे दिली. यावेळी राजसाहेबांनी इतरांना देखील तुमची विकासकामे पाहुन हेवा वाटेल असे गावं घडवा. त्यासाठी काय लागेल ते सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी पक्ष तुमच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी ऊभा राहिल. त्याच बरोबर विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक पक्षाचे नेते प्रवक्ते अनिल शिदोरे यांची थेट या ग्रामपंचायतींवर मार्गदर्शक म्हणुन नियुक्ती केली. गावच्या विकासाची ब्लु प्रिंट तयार करायला सांगुन, या गावांमध्ये विकास कामांचा शुभारंभ धुमधडाक्यात करा. असा आशिर्वाद दिला. यापुढे सतत संपर्कात रहा. तुम्हाला विकास कामांसाठी काही सामाजिक संस्थांकडुन मार्गदर्शन मदत मिळऊन देण्याचेही अश्वासन त्यांनी दिले. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी नितिन सरदेसाई, अभिजीत पानसे, अनिल शिदोरे, संदिप देशपांडे, सुमित खांबेकर, प्रकाश महाजन (ठाणे जिल्हाध्यक्ष), अविनाश जाधव आदींनी अभिनंदन केले व भविष्यात विकास कामांसाठी मदतीचे अश्वासन दिले.

यावेळी मनसेचे (जिल्हाउपाध्यक्ष) संजय शेळके, (तालुकाध्यक्ष) अमोल कोहक, अतुल कोठारे, ढोरजा (ग्रामपंचायत सदस्य) अनिल वानी, अनिल टकले, मेजर रजनिकांत कोठारे, सचिन गावडे, संदिप ठवाळ आदी ऊपस्थीत होते. या भेटीचा योग ध्यानी मनी नसताना राजसाहेबांच्या पत्नी शर्मिलावहीनी यांच्यामुळे भेट झाल्याची माहीती अतुल कोठारे यांनी प्रसार माध्यमांना दिली..!

स्रोत:(अतुल कोठारे,मनसे, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading