गौरी शुगरने गाळपाचा २ लाख मे.टन टप्पा पार केला; ऊसाला प्रतिटन ₹३२०० भाव.!

दिनांक ८ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर (Gauri Sugar) कारखान्याने चालू गाळप हंगामात दोन लाख मेट्रिक टन (MT) ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

देवदैठण येथील दुसरे युनिटही आता सुरू झाले असून, यंदा १० लाख मे.टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांनी माहिती दिली की, या हंगामासाठी गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ₹३२०० चा भाव देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता ₹३१०० प्रतिटन या दराने काढण्यात येईल.

https://amzn.to/4oCtp1t

बोत्रेपाटील यांनी सांगितले की, यंदा साखर कामगारांना २० टक्क्यांनी पगारवाढ दिली असूनही, हा आर्थिक भार सहन करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

उर्वरित ₹१०० दिवाळीच्या वेळी देण्यात येतील, तसेच गेल्या वर्षीप्रमाणे ऊसाच्या प्रमाणात मोफत साखरही दिली जाणार आहे. (गेल्या वर्षी ₹३१०६ भाव होता)

“आमची कुणाशीही कसलीच स्पर्धा नाही, फक्त शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देता येईल हेच धोरण आहे,” असे बोत्रेपाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संचालक रोहीदास यादव यांनी शेतकऱ्यांनी गौरी शुगरला ऊस देण्याचे आवाहन केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading