जनता कर्फ्यूला नागरिकांचा उदंड प्रतिसाद शासन यंत्रणेबद्दलही व्यक्त केली कृतज्ञता

दिनांक २३ मार्च,अहमदनगर:

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नगरकरांनी स्वताच्या घराच्या गॅलरीतून तसेच समोरच्या ओ्ट्यावर येत अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या सर्व यंत्रणांना मानवंदना दिली.

स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाळके, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, महानगरपालिका आयुक्त एस.एन. म्याकलवार यांनी शहराच्या विविध भागात फिरुन या नागरिकांचे आभार मानले. तसेच घराबाहेर पडू नका, स्वताच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन केले. टाळ्यांचा कडकडाट आणि थाळींच्या निनादात आणि भारत माता की जय म्हणून या सर्वांनी अहोरात्र राबणार्‍या हातांना सलाम केला.

शहरातील काही छायाचित्रे :

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading