घोडचे आवर्तन सुटले..पाण्याचा काटकसरीने वापर करावा: आमदार पाचपुते

दिनांक २७ मार्च,श्रीगोंदा:

घोड धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आज आ.पाचपुते यांच्या हस्ते घोड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली होती. त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंत्री स्थरावर पाठपुरावा करून, घोडच्या आवर्तनासंदर्भात ठरवल्याप्रमाणे निर्णय घेतला. आज दिनांक २७ रोजी आ.पाचपुते यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आले.

यावेळी भाजपचे (तालुकाध्यक्ष) संदीप नागवडे, (लेबर फेडरेशनचे संचालक) अनिल पाचपुते,भाऊसाहेब कोळपे, सतीश धावडे, सुनील महाडिक, संतोष रायकर, बाळासाहेब पाचपुते, दिगंबर रायकर, मोहन रायकर, घोडचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Ghod rotation is over..water should be used sparingly: MLA Pachpute

सध्याचे आवर्तन शेतीसाठी सोडले असल्यामुळे सर्वाना पाणी मिळणार असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

स्रोत:(संदीप नागवडे,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading