नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे व नगरसेवक मनोहरदादा पोटे यांनी लग्नाचा वाढदिवस रुग्णसेवा करून केला साजरा..
दिनांक १९ मे,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई मनोहरदादा पोटे व विद्यमान नगरसेवक मनोहरदादा पोटे यांनी कोरोना प्रादुर्भावादरम्यान दिनांक १८ मे रोजी असलेला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस रुग्णसेवा करून साजरा केला आहे.

कोविड सेंटर मधील पिण्याच्या पाण्याची अडचण पाहता माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि विद्यमान नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई पोटे या दांपत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, श्रीगोंदयातील विविध कोविड सेंटरला ३० हजार रुपये किमतीच्या ३०० पाणी बॉटल बॉक्स भेट देऊन, रुग्ण सेवा करत हा वाढदिवस साजरा केला आहे.
पोटे यांचा मंगळवारी १८ मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता. कोविड संक्रमण काळात वाढदिवस साजरा करण्याऐवजी रुग्णांना पिण्याच्या पाण्याचे बॉक्स देण्याचा या उभयतांनी निर्णय घेतला. शहरातील श्री. संत शेख महमंद महाराज (रत्नकमल मंगलकार्यालय) कोविड सेंटरला ७५ बॉक्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथील शासकीय कोविड सेंटरला १०० बॉक्स, छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कोविड सेंटरला ७५ बॉक्स तर, ग्रामीण रूग्णालयात ५० बॉक्स भेट देण्यात आले. husband-and-wife-celebrated-their-wedding-anniversary-in-this-way-in-corona-transition-in-shrigonda
यावेळी (नगरसेवक) सतीश मखरे, निसार बेपारी, समीर बोरा, (वैद्यकीय अधिकारी) डॉ. संघर्ष राजुळे, (व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष) सतीशशेठ बोरा, गौरव बोरा, प्रा. बाळासाहेब बळे, आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त लोक मदत करतात. पण, लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने रुग्णाप्रति सामाजिक बांधिलकी जपल्याने पोटे दाम्पत्यांचे नागरिक आणि कोविड सेंटर मधील रुग्णांकडून कौतुक केले जात आहे.
स्त्रोत:(आयोजित कार्यक्रम)
