श्रीगोंदा | ५ फेब्रुवारी २०२६:
शहरातील महाविद्यालय आणि विद्यालयांच्या परिसरात वाढलेल्या टवाळखोरीला अखेर श्रीगोंदा पोलिसांनी लगाम घातला आहे. दोन दिवसांपूर्वी ‘निर्भीड कलम’ने या गंभीर विषयावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची तातडीने दखल घेत पोलीस यंत्रणा आणि ट्रॅफिक पोलीस अजिनाथ जाधव व भरत चिंधे (सिक्युरिटी) आपल्या टीमसह ‘ऍक्टिव्ह मोड’वर आले.

शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळी परिसरात घिरट्या घालणाऱ्या हुल्लडबाजांची पोलिसांनी कसून चौकशी केली.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेट गाड्यांवर पोलिसांनी दणका दिला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुण वाहनधारकांवर जागच्या जागी कारवाई करून दंड आकारण्यात आला.

या धडक कारवाईमुळे महाविद्यालयीन तरुणी आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
