लॉकडाऊन मध्ये मुलांनी केला परिसर स्वच्छ,खेळण्यासाठी तयार केले मैदान..

दिनांक ८ जून,अहमदनगर:

अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील इरिगेशन ऑफिस जवळील आपल्या राहत्या घरासमोरील परिसर झाडू,खराट्याने स्वच्छ करून मुलांनी लोक डॉन मध्ये खेळण्यासाठी ग्राउंड तयार केले आहे. लोक डॉन पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने तसेच रस्त्यावर फिरण्यासाठी व खेळण्यासाठी बंदी असल्याने मुलांनी आपला परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.आपल्या घरासमोरील ग्राउंड मध्ये विविध प्रकाराचे खेळ खेळता येईल तसेच कोरोनाव्हायरस च्या विषाणूपासून आपला बचाव होईल अशी प्रतिक्रिया मुलांनी दिली आहे.

आपला परिसर स्वच्छतेसाठी फैजान इरफान बागवान,जैद मतीन बागवान, अननस अतिक बागवान,सिहान मोबीन बागवान,आरहान मोबीन बागवान आदींनी चिकाटीने मेहनतीने परिश्रम घेतले आहे. मुलांचे स्वच्छतेचे काम पाहून इरफान मौला बागवान यांनी ग्राउंडला तारेचे कंपाऊंड केले असून,मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले, या स्वच्छतेच्या उपक्रमाचे बाळासाहेब साळवे, राजगुरू सर, तसेच परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

(पत्रकार:रिजवान बागवान)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading