दिनांक ८ जून,श्रीगोंदा:
ज्या बबनराव पाचपुते यांनी अख्तर शेख यांना तीन वेळा नगरसेवक केलं, अडीच वर्षे उपनगराध्यक्ष केलं ते आता पाचपुते यांच्यावर टीका करत आहेत. श्रीगोंदा नगरपरिषदेतील झारीतील शुक्राचार्य असणाऱ्या शेख यांनी आळीपाळीने सर्वांची वकिली करावी. वेळप्रसंगी त्यांचे जे अडवणूकीचे धंदे चालतात ते ही करावेत. पण बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करू नये. असा सल्ला उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी दिला आहे.
कुकडीच्या पाण्यावरून बबनराव पाचपुते यांच्यावर शेख यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर खेंडके यानी देताना शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे.शेख हे २०१४ ला पाचपुतें पासून बाजूला झाले. काही ही नसताना त्यांना उपनगराध्यक्ष पदापर्यंत पाचपुते यांनी आणलं. बाजूला झाल्या पासून ते बबनराव पाचपुते व पाचपुते कुटुंबावर अप्रत्यक्ष बोलत होते. आता ते उघड भूमिका घेत आहेत. नगरपरिषद मध्ये अनेक कामांना खोडा घालणे, काम अडविणे अनेकांना त्रास देणे, हे काम त्यांच्याकडून सुरू असते. पाचपुते ना त्रास देण्याचा प्रयन्त त्यांनी अनेकवेळा केला. याचेच फळ म्हणून, त्यांना दोन वेळा पराभवाची धूळ चाखावी लागली.
पाचपुते यांच्यावर बोलण्यापूर्वी त्यांनी २०१६ व २०१९ च्या नगरपालिका निवडणुकीचा निकालाची आठवण त्यांनी ठेवावी. बबनराव पाचपुते व कुटुंबियांवर शेख यांचे टीका टिप्पणी सुरूच राहिली. तर, आम्हाला जश्याच तसे उत्तर द्यावे लागेल! हे ध्यानात घ्यावे.असे खेंडके म्हणाले आहेत.
****
तुमच्या विषयी तर कोणालाच शंका राहिली नाही : नागवडे.
माझ्या शैक्षणिक कार्याची चौकशी करण्याची भाषा शेख यांनी केली. मी काय केलं ? अन काय नाही. याची तुम्ही माहिती घ्यावि अनं हिंमत असेल तर, सर्व गोष्टी जनते समोर आणाव्यात. तुम्ही कशासाठी काय करता ? हे सर्वांना आता माहीत झाले आहे. तुमच्या विषयी तर कोणालाच शंका राहिली नाही. शेख यांनी आता तरी डोळे उघडून दूध प्यावे : (संदिप नागवडे भाजप तालुकाध्यक्ष, श्रीगोंदा)..
