दिनांक १२ जानेवारी,श्रीगोंदा/पारनेर:
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव पाचपुते व आमदार लंके यांच्या वक्तव्याची व आश्वासनांची दखल निवडणूक आयोगाने घेतली असल्याची माहिती मिळाली आहे .

पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याचे माहिती मिळते आहे. निवडणूक तालुका निरीक्षकांमार्फत याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास स्थानिक विकास निधीतून अशा गावांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. श्रीगोंद्याचे आमदार पाचपुते यांनीही १० लाख रुपये बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना देण्यात येईल. असे जाहीर केले होते. या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली असल्याचे समजते आहे.
या दोन्ही वक्तव्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागविला असून, तालुका निरीक्षकांमार्फत हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार ?हे पुढे समजेलच..
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
