दिनांक १२ जानेवारी, श्रीगोंदा:
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रचंड इंधन दरवाढ झालेली आहे. देशात कोव्हीड सारख्या महामारीने शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल व नुकसान झालेले आहे.
त्यामध्ये न परवडणारी इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. सदर इंधनाचे दर लवकरात लवकर केंद्र सरकारने कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा.अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची असेल, याबाबत श्रीगोंदयाचे तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी,ऋषिकेश गायकवाड (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), संदीप उमाप (तालुकाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), गोरख घोडके (तालुका कार्याध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), राहुल बागे (शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), मानव जाधव (शहर उपाध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग), शैलेंद्र सांगळे (तालुका सचिव, सामाजिक न्याय विभाग) सह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(निवेदन)
