दिनांक १३ फेब्रुवारी २०२५,अहिल्यानगर:
जिल्ह्यात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे.

या वॉररूमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे १००० हून अधिक परीक्षा केंद्रांची पाहणी केली. नियमभंग करणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले असून परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्ह्यातील १४ तालुके आणि अहिल्यानगर शहरातील १०९ हून अधिक केंद्रांवर सीसीटीव्ही, ड्रोन आणि गुगल मीटच्या मदतीने नजर ठेवली जात आहे. यामुळे कॉपीमुक्त परीक्षांसाठी मोठे यश मिळत आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सहकार्याने परीक्षांचे काटेकोर निरीक्षण सुरू आहे.

या मोहिमेत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे, लहू गिरी आदी अधिकारी व तांत्रिक सहायक डॉ. अमोल बागूल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Advertise..
