दिनांक १० जानेवारी अहमदनगर:
दलित महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी काशिनाथ सुलाखे पाटील यांची निवड दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते मच्छिंद्र सकटे यांनी केली.
शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे दलित महासंघाचे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सुलाखे पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर जिल्हा दलित महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष आर.बी रंधवे समवेत जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, चंद्रकांत चव्हाण, कडूबाबा लोंढे, चंद्रकांत सकट, दीपक जाधव, बन्सी वाघमारे, रफिक शेख, भगवान जगताप, सागर साळवे, अंकुश राक्षे, दत्ता शेलार, दत्तात्रय बर्डे, मंदाकिनी मेंगाळ, बाळासाहेब पवार, मीराताई फाजगे, हरिश्चंद्र मोरे, राजू रोकडे, वरूण वाघमारे, सुनील पारधे, अनिल मधे, वसंत जगधने, लक्ष्मीकांत भालेराव, रवींद्र भालेकर, भाऊसाहेब मधे, अंकुश फाजगे आदीसह दलित महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील म्हणाले की, दलित महासंघाच्या वतीने अनेक आंदोलने मोर्चे करून, वंचितांना न्याय देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. केलेल्या कार्य व कामाची दखल घेत निवड ही करण्यात आली असून, येणाऱ्या काळात दलित महासंघाचे कार्य तळा गळा पर्यंत पोहोचविण्याचे व संघटना बळकटीसाठी काम करून वाडी वस्त्यांवर गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवत जेथे अन्याय, अत्याचार होणार तेथे दलित महासंघ खंबीरपणे उभी राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भिंगार शहराध्यक्षपदी वरून वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे यांनी मानले.
स्रोत:(चंद्रकांत सकट, दलित महासंघ)
