मतदार बांधवांनी मनसेच्या उमेदवारास मतदान करून योग्य प्रतिनिधी निवडावा.. हराळ..

दिनांक १० नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:

मतदार बांधवांनी मतदान करताना ५०० रुपयांच्या तात्पुरत्या प्रलोभनांना बळी न पडता योग्य प्रतिनिधी निवडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचे प्रलोभन देत आहेत. मात्र, हे पैसे पुढे त्यांच्याकडूनच कर, टोल, रोड टक्केवारी, वाहन खरेदी, विजेचे दर, ऊस दर अशा विविध माध्यमांतून वसूल केले जातील, असे मत पत्रकार वैभव हराळ यांनी मांडले आहे.

तसेच शिक्षण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना डोनेशनच्या नावाखाली लाखो रुपये मोजावे लागत आहेत. अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करतात, तर नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. श्रीगोंदा शहरात अद्याप कृषी विद्यापीठ आलेले नाही. तालुक्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या, तसेच रोजगाराच्या संधी कमी मिळत आहेत. अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने दिली जात आहेत; मात्र त्यांची पूर्तता होताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर मतदार बांधवांनी विचारपूर्वक मतदान करून चांगले सरकार निवडून द्यावे, ज्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी अर्ज करताना किंवा पैशाचा विचार करावा लागणार नाही, तसेच नोकरीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. मनसेचे उमेदवार संजय शेलके श्रीगोंदामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांनी शहराच्या आणि मतदारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला मोठा फायदा होईल.

मनसे पक्षाच्या रेल्वे इंजिन पुढील बटन दाबून संजय शेळके यांना मतदान करून त्यांना संधी देण्याचे आवाहन हराळ यांनी केले आहे.

स्रोत:(पत्रकार वैभव हराळ)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading