श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय मक्तेदारीवर प्रश्नचिन्ह..: गोरख आळेकर..

दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाचपुते, नागवडे, जगताप घराण्यांचीच राजकीय मक्तेदारी आहे. हे नेते स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेत असले तरी त्यांनी तालुक्याच्या मूलभूत समस्यांवर कधीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. एमआयडीसी, साकाळाई योजना, पाणी वाटप, रस्ते, वीज यांसारखे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित आहेत.

मतदारांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज असून, अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत – बबनराव पाचपुते यांनी स्वतःचा साखर कारखाना काढण्यामागचे कारण काय? विकी पाचपुतेनी मतदारसंघात किती वेळा भेट दिली? बेरोजगारीसाठी उपाययोजना का नाहीत? अनुराधा नागवडे सभापती असताना विकासकामे का झाली नाहीत? अशा विविध प्रश्नांवर मतदारांनी विचार करावा, असे मत गोरख आळेकर यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी वंचित आघाडीच्या उमेदवाराविषयीही मतदारांचे संशय आहेत, की ते विकास करण्यासाठी नसून इतर नेत्यांना मदत करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत काय? असा आरोपही आळेकर यांनी केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading