दिनांक ११ एप्रिल २०२४, कोळगाव:
महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाज सुधारक होते. त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा काढली. स्त्री शिक्षणाचा पाया रचला. समाजातील स्पृश्य अस्पृश्य भेदभाव दूर केला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. प्रथम शिवजयंती जन्मोत्सव सुरू केला. या सर्व कार्यामध्ये त्यांना अनेक वेळा हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या.. परंतु, पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची त्यांना मोलाची साथ मिळाली, असे उद्गार महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कोळगाव येथे झालेल्या समारंभात हेमंत नलगे यांनी काढले.
कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील जातीभेद दूर केला. अन्याय दूर केला. बालविवाह प्रथा बंद केली. प्रत्येक समाजातील महापुरुषांनी फक्त आपल्या जातीसाठी कार्य केले नसून, सर्व समाजासाठी कार्य केले. त्यांनी कुठलाही जातीभेद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून, थोर कार्य केले. असे प्रतिपादन लगड यांनी यावेळी केले.
या समारंभास मार्केट कमिटीचे संचालक नितीन डूबल, कुकडी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विश्वास थोरात, संचालक मच्छिंद्र नलगे, उपसरपंच संतोष मेहत्रे, सदस्य चिमणराव बाराहाते, संकेत नलगे, जयराज लगड, महेंद्र रणसिंग, स्वप्निल धस, शरद लगड, अण्णा साके, बाळासाहेब मोहारे, गोटू लगड, संभाजी लगड, गोरख घोंडगे, दादासाहेब लगड, वैजयंता लगड, ओंकार नलगे, सुयश जाधव, नितीन मोहारे, बापू साके, ऋषिकेश डुबल, या कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महात्मा फुले जयंतीचे नियोजन संत सावतामाळी मित्र मंडळ, शिंदे मळा यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच नितीन नलगे तर आभार प्रदर्शन उपसरपंच संतोष मेहत्रे यांनी केले.
सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना कोळगाव मध्ये महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने व शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या धजाच्या मिरवणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी डॉ.धनश्री विखे यांनी दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांना आकर्षित करण्याची योग्य वेळ साधली. ही चर्चा कोळगाव मध्ये रंगली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपापल्या पक्षाच्या नेत्यांना अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित ठेवण्याची चुरस या निमित्ताने दिसून आली.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)
