माळढोक संरक्षित क्षेत्र अतिक्रमनाच्या विळख्यात; विहीर खोदकाम, पक्के घरं, रस्ते बांधकाम होत असतांना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..वन्यजीव प्रेमींचा उपोषणाचा इशारा..

दिनांक १२ फेब्रुवारी(कामठी,श्रीगोंदा):

तालुक्यातील कामठी येथे माळढोक संरक्षित क्षेत्रावर बहुतेक ठिकाणी अतिक्रमन झाल्याचे समजते आहे. विहीर खोदकाम, पक्के बांधकाम, रस्ते अश्या पध्दतीने बहुतांश क्षेत्र अतिक्रमनाच्या विळख्यात सापडल्याचे भागचंद आरडे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामठी हे श्रीगोंदा तालुक्याचे उत्तरे कडील टोक व वनराईने नटलेले गांव आहे. बहुतांश भाग हा वनविभागच्या अधिपत्याखाली येतो. पण, याठिकाणी पर्यावरण संरक्षण व वृक्ष लागवड ही फक्त कागदावरील बाब राहिली आहे. सदरील भाग माळढोक अभयारण्यासाठी शासनाने संरक्षित केलेला असुन, या भागात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. या परिसरात कोणते ही खोदकम व इतर बदल करता येत नसतानाही, काहीनीं चक्क विहिरी खोदल्या आहेत. शेजारी अतिक्रमण करुन पक्के बांधकामे केली आहेत. काहींनी तर चक्क नदयाच अडवल्या आहेत.

या सर्व गैरप्रकारांकडे वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने, त्यांचे यांतून काही अर्थार्जन तर, होत नाही ना ? असा सवाल सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अश्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकारी ही हेतुपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. मात्र, याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत परिणामी वन्य प्राणी मरण पावत आहेत. हे अभयारण्य नावापुरतेच उरले आहे. जंगलास दिवसागणिक आगी लागत आहे. अश्या परिस्थितीमुळे अधिकारी नावा पुरतेच असल्याचे सर्वांचा समज झाला आहे.

संबंधित अधिकारी गुरे चारणाऱ्या गोरगरीब गुरख्यानां मारहाण, दंमदाटी करत असल्याचे समोर येत आहे. या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, अधिकारी निलंबित व्हावेत, अशी मागणी वन्यजीव प्रेमीं करीत आहेत. या प्रकरणाची गंभीरपणे दखल न घेतल्यास ? आजाद मैदान, मुंबई येथे उपोषनाच्या तयारीत असल्याचा इशारा वन्यजीव प्रेमी श्री. भागचंद सबाजी आरडे यांनी दिला असून, याबाबत त्यांनी माध्यमांना प्रसिद्धी पत्र दिले आहे.

स्रोत:(प्रसिद्धिस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading