#श्रीगोंदा..समताभूमीत आजपासून विचार प्रबोधन सप्ताहाची सुरुवात..

दिनांक १२ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक समताभूमीत सुफी संत शेख महंमद बाबा मठाच्या प्रांगणात आज दिनांक १२ फेब्रुवारी पासून १९ फेब्रुवारी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत पुरोगामी चळवळीचा इतिहास व महापुरुषांच्या महान विचारांचा संदेश ‘विचार प्रबोधन सप्ताहा’च्या माध्यमांतून अभ्यासू वक्ते मांडणार आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

महामानवांचे वैचारिक तत्वज्ञान आत्मसात करण्यासाठी समतावादी चळवळीतील सर्वांनी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रबोधनकार आपले विचार व्यक्त करणार आहेत.

सामाजिक कार्यकर्ते ऍड. संभाजीराव बोरुडे, मुकुंदराव सोनटक्के, बापूराव माने, प्रदीप खामगळ, संतोष इथापे, मच्छिंद्र (काका) सुपेकर, अनिल ठवाळ, बबन दांडेकर, सौ.अनुराधा ताई ठवाळ, दादा औटी, अनिल (महाराज) औटी, बाळासाहेब धोत्रे महाराज, वामन (भाऊ) भदे, साहेबराव रासकर, भीमराव कोथिंबिरे इत्यादी कार्यकर्ते नमूद कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्रिय आहेत. सदरील कार्यक्रमाचे आयोजन संत शेख महंमद बाबा ट्रस्ट, सामाजिक ऐक्य परिषद, सावित्री फातिमा विचार मंच, फुले – शाहू – आंबेडकर विचार मंच, प्रहार संघटना तसेच संभाजी ब्रिगेड यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ऐतिहासिक ‘शिवजयंती उत्सव सप्ताह’ कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १२ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ६:०० वाजता संभाजी ब्रिगेड व मराठा महासंघाचे प्रवीणदादा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद (ज्येष्ठ विचारवंत) असून, व्याख्याते आर. एस. यादव (परभणी) हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून, संभाजी ब्रिगेडचे माजी श्रीगोंदा (तालुकाध्यक्ष) अरविंद कापसे हे आहेत. तर, उपस्थितीमध्ये गणेश आण्णा झगडे, मच्छिंद्र चांदणे व कुमार आहेर असतील. मानवी मूल्य मांडणाऱ्या महापुरुषांचा विचार आणि त्यांनी समाजासाठी केलेला त्याग जगासमोर यावा म्हणून, या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

याचबरोबर गणेश फरतळे, संदीप थोरात, दिनेश मुरकुटे, नवाज शेख, प्रशांत खामकर, दिनेश पाटील हे व्याख्याते या प्रबोधन मालिकेत अनुक्रमे आपले विचार व्यक्त करणार आहेत. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वाजता शिवजयंती सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न होईल. त्यासाठी शंकरराव आण्णा लिंगे हे कार्यक्रम अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक प्रवीण दादा सोळंके, प्रमुख पाहुणे सौ. अनुराधाताई नागवडे तर, प्रमुख उपस्थितीत आण्णाराव पाटील असतील.

स्रोत:(मुकुंद सोनटक्के,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading